माननीय मुरलीधर मोहोळ, महापौर पुणे आयोजित कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ‘युगनायक विवेकानंद’ या महानाट्यास सुरवात करण्यात आली. याप्रसंगी कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष प्रल्हादजी कोकरे, मॅनेजिंग डायरेक्टर सुहासजी गोखले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघसंचालक श्री. रविंद्रजी वंजारवडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र संपर्कप्रमुख श्री. कैलासजी सोनटक्के, पुणे रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंद महाराज, महानाट्याचे निर्माते केदारजी पंडित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम कॉसमॉस बँकेने प्रायोजित केला होता.