Cosmos Bank contributes to the Prime Minister and Chief Minister Relief Funds.
Cosmos Bank’s Chairman CA Milind Kale, Managing Director Suhas Gokhale, Staff Representative Umesh Datar handover the donation cheque for Prime Minister and Chief Minister Relief Funds to Pune Divisional Commissioner Dr. Deepak Mhaisekar.
On the backdrop of Corona virus pandemic, The Cosmos Co-operative Bank Ltd., has contributed with the amount of Rs.55 Lakh to Prime Minister and Chief Minister Relief Funds. The staff of Cosmos Bank have contributed one day of their salary, bank management also contributed in the said relief funds. Amongst the total amount collected, Rs.35 Lakh is donated for the Chief Minister Relief Fund and remaining Rs. 20 Lakh is donated for the PM Care Fund, informed Cosmos Bank’s Chairman, CA Milind Kale.
During the lockdown period up till now, the Bank has assisted more than 250 needy persons with food, water, clothing etc. This assistance is given near Sassoon Hospital, Corporation School no. 90, Wadarwadi, Pandavnagar, leprosy settlement Yeolewadi, stated Chairman Kale.
Considering the financial liquidity stress on businesses, due to COVID-19 pandemic, Cosmos Bank has provided additional 10% working capital credit line to all its existing borrowers for the period of 6 months from 21 st March 2020. During this crisis period, Cosmos Bank has made available all the relaxations declared by Reserve Bank of India, to its borrowers, informed Kale.
कॉसमॉस बँकेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधी व पंतप्रधान केअर फंडमध्ये मदतीचा धनादेश पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना देताना बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे, व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले व सेवक प्रतिनिधी उमेश दातार.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॉसमॉस बँकेने पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीस ₹ ५५ लाखाची मदत केली आहे. कॉसमॉस बँकेच्या सेवकांनी आपले एक दिवसाचे वेतन याकरिता दिले असून बँक व्यवस्थापनानेही या निधीमध्ये आपले योगदान दिले आहे. एकत्रितपणे जमा झालेल्या निधीपैकी ₹ ३५ लाख इतकी रक्कम ही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये व उर्वरित ₹ २० लाख इतकी रक्कम ही पंतप्रधान केअर फ़ंडमध्ये जमा केली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी दिली.
टाळेबंदीच्या काळात रोज सुमारे २५० गरजू व्यक्तींना जेवण, पाण्याच्या बाटल्या, कपडे इत्यादींची मदत कॉसमॉस बँकेतर्फे करण्यात येत आहे. आत्तापर्यंत ससून हॉस्पिटल परिसर, कॉर्पोरेशन शाळा क्र.९० वडारवाडी, पांडवनगर, कुष्ठरोग वस्ती येवलेवाडी या भागात बँकेतर्फे मदत पोचविण्यात आल्याचे काळे यांनी सांगितले.
कोरोना आपत्तीमुळे उद्योग व्यवसायांवर ओढविलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सर्वप्रथम कॉसमॉस बँकेने आपल्या सर्व व्यायसायिक खातेदारांकरिता असलेल्या खेळत्या भांडवल कर्जमर्यादेत १०% पर्यंत वाढ केली आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी ग्राहकांसाठी जाहीर केलेल्या सवलती कॉसमॉस बँकेने आपल्या सर्व कर्जदारांना त्वरित उपलब्ध करून दिल्याची माहिती काळे यांनी दिली.
सध्याच्या परिस्थितीचा विचार करता कॉसमॉस बँक पुणे शहर, तसेच पिंपरी चिंचवड परिसरात ग्राहकांच्या सोयीसाठी Mobile ATM VAN ची सुविधा लवकरच सुरु करीत आहेत.