Women’s Day Celebration
जागतिक महिलादिन कॉसमॉस बँकेत उत्साहाने साजरा
जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून कॉसमॉस बँकेतील महिलांचा रविवार दि. ८ मार्च रोजी मुख्य कार्यालय कॉसमॉस टॉवर येथे ‘ महिलादिन ‘ उत्साहाने साजरा करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष सी.ए. मिलिंद काळे व इतर उपस्थित संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
या प्रसंगी काळे यांनी बँकेतील सर्व महिला कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, बँकेच्या उत्कर्षात महिलांचा मोलाचा वाटा आहे. बँकेला नेहमीच महिलांच्या कर्तृत्वाबद्दल अभिमान वाटतो. अध्यक्ष काळे यांनी सांगितले की, नवनिर्वाचित संचालक मंडळात आवर्जून २ महिलांचा समावेश केला आहे.
बँकेचे वयवस्थापकीय संचालक सुहास गोखले यांनी याप्रसंगी महिला कर्मचाऱ्यांना कायम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व यशस्वी महिलांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये पद्मिनी गाडगीळ, प्रीती कुडाळ, सुरेखा लवांडे, डॉ. अक्षया जैन, स्नेहलता छत्रे, अंजली देशमुख, शुभांगी देशपांडे, डॉ. पल्लवी कळुसकर, अश्विनी मुजुमदार, कांचन ढमाले, आणि मनाली देवी यांनी विविध विषयांवर उपस्थित महिला सेवकांना मार्गदर्शन केले. स्त्रियांनी बाह्य सौंदर्याबरोबर अंतर्मनही सुंदर ठेवले तर जगाकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो. प्रामाणिकपणा आणि कष्टाचे तेज यामुळे आत्मविश्वास वाढतो. वेळेचे योग्य नियोजन करणे, सतत अभ्यासू वृत्ती बाळगणे, कामाबरोबरच छंद जोपासणे, नियमित योगासनांद्वारे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे इ. विचार यावेळी विविध यशस्वी महिलांनी मुलाखतींमधून मांडले. त्याचबरोबर बँकेकडून मिळणाऱ्या सेवा -सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. सदर मुलाखती मनिषा सबनीस व नीलम बेंडे यांनी घेतल्या.
यावेळी महिलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या समारंभास कॉसमॉस बँकेचे समूह अध्यक्ष, डॉ. मुकुंद अभ्यंकर, अध्यक्ष, सी.ए. मिलिंद काळे, उपाध्यक्ष, अॅड. प्रल्हाद कोकरे, सर्व संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमहाव्यवस्थापिका लता घारे आणि प्राची घोटकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन लता घारे यांनी केले.