<img height="1" width="1" style="display: none" src="https://www.facebook.com/tr?id=1773580009503867&amp;ev=PageView&amp;noscript=1">

इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं-6, सर्वे.नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

कॉसमॉसची कार्यशैली

लक्ष्य वेध
  • जागतिक दर्जाची सहकारी बँक म्हणून प्रस्थापित होणे.
  • बँकिंगचा अर्थपूर्ण, आल्हाददायक, अविस्मरणीय अनुभव देणे.
  • आमच्या संपर्कात येणा-या प्रत्येकाचं आयुष्य तसंच अवघं समाजजीवन समृध्द करणे.
  • आमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची -ग्राहक, कर्मचारी, गुंतुवणूकदार, सभासद व इतर संबंधित व्यावसायिक यांची सर्वप्रथम पसंतीची बँक ठरणे.
  • जागतिक पातळीवरील अद्ययावत आदर्श संस्था म्हणून प्रस्थापित होणे.
ध्येय मार्ग
  • सातत्याने नाविन्याचा वेध घेत आधुनिक सकंल्पनाचा पुरस्कार करणे.
  • नात्यांमधील आपुलकी आणि जिव्हाळा जपणारी, विषयाचे सखोल ज्ञान असणारी, विनम्र वागणुकीने ग्राहकांसाठी सतत, सदैव उपलब्ध असणाऱ्या व्यावसायिक दृष्टीकोन असणाऱ्यांची "टीम कॉसमॉस” घडविणे.
  • सहकार क्षेत्राच्या सर्व सुप्त क्षमता पूर्णतः विकसित करण्याच्या दृष्टीने कटिबध्द् होणे.
  • सर्वोच्च नैतिक मूल्ये, व्यावहारिक सचोटी, उत्तम प्रशासन आणि नियामक अनुपालन यांचा आग्रही पुरस्कार करणे.
मूल्य जतन
  • ग्राहककेंद्रीत कार्यसंस्कृती
  • सातत्यपूर्ण प्रशिक्षण
  • तंत्रज्ञान आणि सवंदेनशीलता
  • मूल्यनिष्ठा
  • पारदर्शी व्यवहार
  • संघभावना
  • परिणामकारक कार्यशैली
  • लोकांचे सक्षमीकरण

सिंहावलोकन

कॉसमॉस बँक गेली 119 वर्षे ग्राहकांच्या सेवेत अविरतपणे कार्यरत आहे. बँकेंच्या 7 राज्यात 183 शाखा आहेत. जवळपास 20 लाख समाधानी ग्राहक हेच बँकेवरील विश्वासाचे प्रतिक आहे. गेल्या दशकात सातत्याने प्रगती करत, आपल्या व्यावसायिक कार्यपध्दतीने सहकारी बँकांपुढे एक आदर्श उभा केला आहे. बँक सर्वोच्च नैतिक मुल्ये, व्यावसायिक सचोटी, उत्तम प्रशासन आणि नियामक अनुपालन राखण्यासाठी वचनबध्द आहे. बँकेची स्थापना 1906 मध्ये ग्राहकांच्या आर्थिक गरजा समजून घेऊन त्यानुसार वैयक्तिक सेवासुविधा देण्यासाठी करण्यात आली. बीसीएसबीआयचे (BCSBI) सदस्यत्व असल्याने बँक आपल्या ग्राहकांना मानांकनानुसार बँकिंग सेवा पुरविण्याची खात्री देते.

संचालक मंडळामध्ये विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींचा समावेश आहे. सर्व संचालकामध्ये बँकेसाठी अनुरूप अशी उत्तम धोरणे तयार करण्याचा दृष्टीकोन आहे बँकेचे व्यवस्थापन, उच्चशिक्षीत, समर्पित, कार्यक्षम आणि प्रामाणिक समूहाद्वारे केले जाते.

कॉसमॉस बँक ही केवळ एक मल्टीस्टेट शेडयूल्ड सहकारी बँक नसून एक व्यावसायिक दृष्टीकोन असलेली 'वित्तीय संस्था' आहे.

कॉसमॉस बँक आपल्या ग्राहकांसाठी पुढील सर्वोत्तम सेवा देते:

आमच्या एटीएम नेटवर्कद्वारे कधीही व कुठेही बँकिंग सुविधेचा लाभ घेता येतो.
आमच्या शाखांमध्ये ऑनसाईट व ऑफसाईट एटीएम सेवा उपलब्ध
बँका आणि एनएफएस टाय अपद्वारे 2.49 लाखांहून अधिक एटीएम्स जोडलेले आहेत
ग्राहकांच्या खात्यांमध्ये अंतर्गत फंडस् ट्रान्सफर करण्यासाठी स्वीप सुविधा
आमच्या कोणत्याही शाखेच्या कोणत्याही खात्यात रक्कम हस्तांतरीत करण्याची सुविधा.
जलद फंडस् ट्रान्सफर साठी आरटीजीएस / एनइएफटी सेवा
ईलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग योजनेद्वारे (ECS)मुदत ठेवींवर नियमितपणे व्याज वितरित
खात्यांची विवरणपत्रे ई-मेलद्वारे उपलब्ध आहेत
खात्यातील शिल्लक, शेवटच्या तीन व्यवहारांची आणि चेकची स्थिती पाहण्यासाठी एसएमएस सुविधा
फ्रँकिंग सेवा उपलब्ध
पुणे महानगर पालिका कर भरणा सुविधा, ई-कर भरणा सुविधा उपलब्ध
टेलिफोन, इलेक्ट्रिक, मोबाईल बिले, इन्शुरन्स प्रीमियम, डोनेशन्स इत्यादींसाठी युटिलिटी बिल भरण्याची सुविधा

भौगोलिक विस्तार क्षेत्र

31.03.2024 रोजी बँकेचा आर्थिक व्यवसाय ₹ 35,407.84 कोटींचा आहे, ज्यामध्ये ₹ 20,216.22 कोटींच्या ठेवी आणि ₹ 15,191.62 कोटी कर्जपुरवठयाचा समावेश आहे.

कॉसमॉस बँकेच्या 183 भारतातील शाखा पसरले 7 राज्यांमध्ये आणि 44 प्रमुख शहरांमध्ये, जे खालील प्रमाणे आहेत

अनु. क्र. राज्य शहरे
1 महाराष्ट्र मुंबई | पुणे | नागपूर | छत्रपती संभाजीनगर | नाशिक | बारामती | जालना | कोल्हापूर | सातारा | लातूर | फलटण | सांगली |
सोलापूर | भुसावळ | जळगाव | अमरावती | यवतमाळ | इचलकरंजी | अहमदनगर | बडनेरा |
कराड
2 गुजरात सुरत | अहमदाबाद | वडोदरा | अंकलेश्वर | राजकोट | भुज | गांधीधाम | भावनगर | मोरबी | नडियाद | आणंद | वापी
3 कर्नाटक बेंगळुरू | बेळगावी | निपाणी | म्हैसूर
4 तामिळनाडू चेन्नई | कोईम्बतूर | होसूर
5 आंध्र प्रदेश विजयवाडा
6 तेलंगणा हैदराबाद | सिकंदराबाद
7 मध्य प्रदेश इंदूर

आमचे आर्थिक सामर्थ्य

"कॉसमॉस बँक ही भारतातील सर्वात जुनी आघाडीची सहकारी बँक आहे. शतकाहूनही अधिक काळ नाविन्यपूर्ण व्यवसायांच्या माध्यमातून बँकेने आर्थिक पाया अधिक भक्कम केला आहे.

31.03.2025 रोजी बँकेचा आर्थिक व्यवसाय ₹ 38,634.27 कोटींचा आहे, ज्यामध्ये ₹ 22,907.20 कोटींच्या ठेवी आणि ₹ 15,727.07 कोटी कर्जपुरवठयाचा समावेश आहे.

A] आर्थिक

₹ कोटी मध्ये

अनु. क्र. तपशील 31.03.2025 रोजी 31.03.2024 रोजी
1 भाग भांडवल 349.78 344.48
2 रिझर्व्स आणि सरप्लस 2,497.56
2,149.33
3 भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर)% 15.15% 15.43%
ठेवी
4 बचत ठेव 3,883.95 3,676.19
5 चालू ठेव 1,984.07 1,556.93
6 मुदत ठेव 17,039.18
14,983.10
  एकूण 22,907.20 20,216.22
कर्जपुरवठा
7 सुरक्षित 15,435.54 14,862.86
8 विनातारण  291.53  328.76
  एकूण 15,727.07
15,191.62
9 कर्ज घेणे 689.46 673.98
10 एकूण गुंतवणूक 9,035.97 5,996.53
11 ओव्हरडयू (%) 2.52% 1.83%
12 निव्वळ नफा 180.62 384.05
13 मागील वर्षाचा नफा सी/एफ 296.53 131.56
14 खेळते भांडवल 26,896.03
23,445.17

B] इतर

अनु. क्र. तपशील 31.03.2025 रोजी 31.03.2024 रोजी
1 एकूण शाखा 183 170
2 सभासद 1,13,474 1,07,028
3 नाममात्र
सदस्य (कर्जदार)
4588 4790
  एकूण कर्मचारी 3130 2849

आमचे संचालक मंडळ

अ‍ॅड. प्रल्हाद कोकरे
अध्यक्ष
M. Sc. (Agri.), LL.B., GDC & A
  • अ‍ॅड. प्रल्हाद कोकरे हे 2004 पासून बँकेचे संचालक आहेत. ते 2019-2020 आणि 2020-2021 मध्ये बँकेचे उपाध्यक्ष होते आणि ते सहकारी बँकिंग आणि कायदे विशेषत: कृषी बाजार कायद्यातील तज्ञ आहेत.
अधिक वाचा
सीए यशवंत कासार
उपाध्यक्ष
FCA (ICAI), BFP ACA (ICAEW-UK), CISA, CGEIT, DISA, PMP, FAIA
  • सीए. यशवंत कासार हे चार्टर्ड अकाउंटंट असून इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स इन इंग्लंड अँड वेल्स (आयसीएईडब्ल्यू-यूके) चे सदस्य आहेत, तसेच इन्फॉर्मेशन सिस्टम
अधिक वाचा
Mrs. Rasika Gupta
संचालक
M. A., Ph. D Economics
  • सौ. रसिका गुप्ता या डेटा ॲनालिटिक्स, बिझनेस इंटेलिजन्स, स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग आणि डेटा स्ट्रॅटेजी यामध्ये तज्ञ असून डायनॅमिक इकॉनॉमिस्ट आहेत, ज्या व्यवसाय आणि तंत्रज्ञानाचा दुवा म्हणून काम करतात.
अधिक वाचा
सीए सुरेखा जोशी
संचालक
B. Com and M. Com with Distinction, Chartered Accountant
  • सीए सुरेखा जोशी यांना 28 वर्षांहून अधिक सहकारी बँकिंगचा प्रदीर्घ अनुभव आहे.
अधिक वाचा
श्री. प्रवीणकुमार गांधी
संचालक
Chartered Accountant
  • श्री. प्रवीणकुमार गांधी हे चार्टड अकाउंटंट असून त्यांना जनरल इन्शुरन्स क्षेत्राचा 32 वर्षांचा समृद्ध अनुभव आहे. त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे.
अधिक वाचा
श्री. अजित गिजरे
संचालक
B.E. (CIVIL), M. E. (STRUCT.) – COLLEGE OF ENGINEERING, PUNE
  • श्री. अजित गिजरे हे स्ट्रक्चरल अभियंता आहेत, ते साखर, लोखंड, तांबे आणि ऑटोमोबाईल उद्योग यांसारख्या प्रक्रिया उद्योगांसाठी,
अधिक वाचा
सीए एस. सुब्रमणियम
संचालक
B.Sc., FCA
  • सीए एस. सुब्रमणियम हे गेल्या 35 वर्षांपासून सनदी लेखापाल म्हणून कार्यरत आहेत.
अधिक वाचा
श्री. घनश्याम अमिन
संचालक
B.Sc., LLB
  • श्री. घनश्याम अमिन हे सहकारी क्षेत्रातील एक अनुभवी व्यक्ती असून त्यांना 40 हून अधिक वर्षांचा अनुभव आहे.
अधिक वाचा
श्री. सचिन आपटे
संचालक
B.E. (Civil) & M.E. (Struct) from College Of Engineering, Pune.
  • श्री. सचिन आपटे यांनी पुण्यातील नामांकित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी आणि स्ट्रक्चरल अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
अधिक वाचा
श्री. अरविंद तावरे
संचालक
D.C.E; M. S. CIVIL (US); LEED® -G.A (US); PJM-I (US)
  • श्री. अरविंद तावरे युनायटेड स्टेट्समधून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवीसह ते अभियांत्रिकी पदव्युत्तर आहेत.
अधिक वाचा
डॉ. बाळासाहेब साठे
संचालक
M.E. (Civil), Phd., IIT (Bombay)
  • डॉ. बाळासाहेब साठे यांना अध्यापनाचा 29 हून अधिक वर्षांचा व्यापक अनुभव आहे.
अधिक वाचा
सौ. अनुश्री माळगावकर
संचालक
B.A.(Hons)
  • सौ. अनुश्री माळगावकर 25 वर्षांहून अधिक काळ सहकारी क्षेत्राशी संबंधित आहेत.
अधिक वाचा
सौ. रेखा पोकळे
संचालक
M. A.
  • सौ. रेखा पोकळे गेल्या एक दशकाहून अधिक काळ सहकारी बँकिंग क्षेत्रात आहेत.
अधिक वाचा
सौ. अपेक्षिता ठिपसे
व्यवस्थापकीय संचालिका
M.COM, LLB, CAIIB
  • बँकिंग क्षेत्रामध्ये 40 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या, सौ. अपेक्षिता ठिपसे एक अत्यंत प्रतिष्ठित आणि यशस्वी ज्येष्ठ बँकर आहेत. व्यवसाय वाढवणे, कार्यात्मक कार्यक्षमतेत सुधारणा करणे, नावीन्यपूर्ण आणि ग्राहक केंद्रीत संस्कृती जोपासणे यावर विशेष लक्ष केंद्रित करून पत व्यवस्थापन, वित्त, प्रशासन आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स यामधील त्यांचे कौशल्य, यश सिद्ध झाले आहे.
अधिक वाचा
श्री.उदय लेले
सेवक प्रतिनिधी
B.Com & LLB
  • श्री. उदय लेले, मॅनेजर यांची कर्मचारी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. लेले यांनी बी. कॉम आणि एलएलबी पूर्ण केले असून कॉसमॉस बँकेत मागील 30 वर्षांपासून ते कार्यरत आहेत. ते कॉसमॉस बँक सेवक संघाच्या अध्यक्षपदी देखील होते.
अधिक वाचा