इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं.-6, सर्वे नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

नॉन-कॉलेबल ठेव योजनेची लक्षवेधी वैशिष्ट्ये
सर्वाधिक व्याजदर
नेहमीच्या मुदत ठेव योजनेपेक्षा लक्षवेधी आणि अधिक व्याजदर.
एकरकमी ठेवी
केवळ एकरकमी जमा करण्यात येणार्‍या रू. 10001000.00 आणि त्यापुढील तसेच त्यानंतरच्या रू. 1000.00 च्या पटीतील रकमांसाठी लागू
एक विशेष मुदत ठेव योजना जी आमच्या आदरणीय ग्राहकांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेमध्ये नेहमीच्या मुदत ठेव योजनेपेक्षा लक्षवेधी व्याजदर आहे ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळू शकतो. या योजनेच्या अंतर्गत किमान डिपॉझिट रक्कम रू. 10001000.00(रू. एक कोटी, एक हजार फक्त - एकरकमी) आणि त्यापुढील रू. 1000.00 च्या पटीत आहे. या योजने अंतर्गत रि-इन्व्हेस्टमेंट सुविधा देखील आहे. या योजनेच्या अंतर्गत असलेल्या मुदत ठेव योजनेसाठी, योजनेच्या कालावधी इतकाच लॉकइन कालावधी आहे. या योजनेच्या अंतर्गत मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी नाही.
पात्रता
  • निवासी व्यक्ती (स्वतंत्रपणे किंवा संयुक्तपणे कार्यरत), एचएनआय, एनआरओ, क्लब, संघटना, शैक्षणिक संस्था, भागीदारीतील फर्म आणि नोंदणीकृत कंपन्या, क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी आणि नॉन-शेड्यूल्ड यूसीबी, हिंदू कुटुंब संस्था (एचयुएफ), जी बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार टर्म डिपॉझिट अकाउंट उघडू शकतात.

  • *ही मुदत ठेव योजना अल्पवयीन मुला-मुलींसाठी उपलब्ध नाही.
सुविधा
  • या योजनेच्या अंतर्गत विद्यमान ठेवींच्या रि-इन्व्हेस्टमेंटची सुविधा उपलब्ध आहे
  • या योजनेच्या अंतर्गत नामनिर्देशन सुविधा देखील उपलब्ध आहे.
  • व्याजाचा मासिक/ तिमाही परतावा
आवश्यक दस्तऐवज
  • मार्गदर्शक तत्त्वांनुसार केवायसी आवश्यक.

संपर्क

आमचे तज्ज्ञ तुम्हाला पुढील सहाय्यासाठी 24-48 तासांच्या आत तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करतील. कॉसमॉस बँकेत स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद.

ग्राहकांसाठी महत्वाचे
  • ठेवीदार एकरकमी गुंतवणुकीवर उच्च परताव्याची अपेक्षा करू शकतात
माहीत असावे असे
  • नॉन-कॉलेबल ठेव ही अशा प्रकारची मुदत ठेव आहे, ज्यामध्ये मॅच्युरीटीच्या तारखेपूर्वी पैसे काढता येत नाहीत.
  • नॉन-कॉलेबल ठेव योजना केवळ एकरकमी ठेवींसाठी उपलब्ध आहे, जसे की किमान डिपॉझिट रक्कम ही रू. 1,00,01,000.00. असावी
  • नॉन-कॉलेबल ठेव योजनांसाठी ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध नाही.
  • नॉन-कॉलेबल ठेव कोणत्याही प्रकारच्या आगाऊ मंजूर करण्यात आलेल्या कर्जपुरवठ्यासाठी तारण म्हणून वापरता येत नाही.
  • या योजनेच्या अंतर्गत ऑटो-रिन्युअल उपलब्ध नाही.
  • अधिक तपशिलासाठी कृपया बँकेशी संपर्क साधावा.

*अटी आणि शर्ती लागू