<img height="1" width="1" style="display: none" src="https://www.facebook.com/tr?id=1773580009503867&amp;ev=PageView&amp;noscript=1">

इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं-6, सर्वे.नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

आपल्या सेवेसाठी कॉसमॉस सदैव तत्पर

एक वैशिष्ट्यपूर्ण पेमेंट सिस्टीम ज्याद्वारे आपले सर्व सरकारी अनुदान आणि लाभ हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आधार-लिंक केलेल्या आपल्या बँक खात्यामध्ये जमा होतात. एपीबी सिस्टीमवरून सर्व सरकारी विभाग आणि त्यांच्या प्रायोजक बँकांना आणि लाभार्थी तसेच लाभार्थी बँकांना जोडल्या जातात. डीबीटी योजनांतर्गत आपल्याला मिळणारे फायदे आणि अनुदान ट्रान्सफर करण्याबरोबरच, एपीबीएस आर्थिक समावेशाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाते तसेच सरकारला त्यांच्या अनुदान व्यवस्थापन कार्यक्रमाचे आर्थिक पुनःअभियांत्रिकीकरण करण्याचा प्रयत्न करण्याची संधी दिली जाते.

सरकारने घोषित केलेल्या कोणत्याही प्रकारच्या अनुदानाचा थेट लाभ आपल्याला देण्यासाठी कॉसमॉस बँक पूर्वीपासूनच NACH आधार पेमेंट ब्रिज (एपीबी) सिस्टीमवर कार्यरत आहे.

फायदे: -


  • जुन्या सिस्टीममुळे होणारा विलंब, अनेक चॅनल्स आणि कागदपत्रे आता कमी झाली आहेत.
  • लाभ आणि अनुदान या आधार सक्षम बँक खात्यात थेट आणि वेळेवर पाठवल्या जातात.
  • बँक खाते बदलल्यास सरकारी विभाग किंवा एजन्सीला बँक खाते तपशील किंवा बँक डेटामध्ये बदल सूचित करण्यासाठी ग्राहक बांधील नाही.
  • विविध समाजकल्याण योजनांचे लाभ आणि अनुदान मिळवण्यासाठी ग्राहकांना अनेक बँक खाती उघडण्याची आवश्यकता नाही – ग्राहकांनी फक्त एक खाते उघडणे अपेक्षित आहे आणि त्यांचा आधार क्रमांक बँक खात्याला जोडणे आवश्यक आहे जेणेकरून लाभ आणि अनुदान थेट त्यांच्या आधार सक्षम बँक खात्यात जमा होईल.

खास वैशिष्ट्ये

  • सुरक्षित वेब अ‍ॅक्सेसवरून बँका व्यवहाराच्या फाइल्स अपलोड/डाउनलोड करू शकतात.
  • एनपीसीआय नेट किंवा इंटरनेटवरून बँका एनपीसीआय बरोबर कनेक्ट होऊ शकतात.
  • एनपीसीआय-ने जारी केलेल्या आयएनएन-नुसार व्यवहार केले जातात.
  • इष्ट बँकांकडून आधार क्रमांक वापरून व्यवहारांवर प्रक्रिया केली जाते.
  • एपीबी सिस्टीम आयएसओ 20022 संदेशांच्या प्रमाणांना समर्थन देते.
  • एपीबी सिस्टीम एकापेक्षा अधिक इंट्राडे सत्रांना समर्थन देते.
  • सरकारी विभाग आणि एजन्सींना एपीबी सिस्टीमवरून थेट कॉर्पोरेट प्रवेश (डीसीए) दिला जातो.
  • ऑनलाइन विवाद व्यवस्थापन सिस्टीम (डीएमएस) पुरविली जाते.
  • दररोज 10 दशलक्ष व्यवहार हाताळण्यासाठी एपीबी सिस्टीम सक्षम आहे.
  • कार्यभार आणि सवलतीच्या व्यवहार या दोघांवर एपीबी सिस्टीमवरून प्रक्रिया करता येते.
  • एपीबी सिस्टीमवरून सर्व सहभागींना विकसित एमआयएस उपलब्ध करून दिला जातो.
  • सुरक्षित क्लिअरिंग आणि सेटलमेंट प्रक्रिया एपीबी सिस्टीमवरून पुरविली जाते.

तपशील

तपशील/माहीत असावे असे: -

संपर्क

आपण दिलेल्या नंबरवर 24-48 तासांच्या आत आपल्याला मदत करण्यासाठी आमचे तज्ञ आपल्याला कॉल बॅक करतील. कॉसमॉस बँकेची निवड केल्याबद्दल धन्यवाद