<img height="1" width="1" style="display: none" src="https://www.facebook.com/tr?id=1773580009503867&amp;ev=PageView&amp;noscript=1">

इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं-6, सर्वे.नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

फसवणूक

फसवणूक/संशयास्पद ईमेलची तक्रार नोंदवा


ऑनलाइन बँकिंग सुरक्षा तपशीलांची विनंती करणाऱ्या फसव्या ईमेलपासून सावध रहा!

इंटरनेट बँकिंग हे आपले पैसे व्यवस्थापित करण्याचा एक सुरक्षित मार्ग आहे. मात्र, आजूबाजूला इंटरनेट फसवणूक करणारे अनेकजण आहेत जे आपल्याला ईमेल करून आपल्या खात्याचा अ‍ॅक्सेस मिळवण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्याला आपले ऑनलाइन बँकिंग सुरक्षा तपशील त्यांच्यासमोर उघड करण्यास सांगतील. बँक्स कधीही गोपनीय माहिती विचारणारे ईमेल्स पाठवणार नाहीत. आपल्याला आपल्या इंटरनेट बँकिंग सुरक्षा तपशीलांची विनंती करणारा ईमेल मिळाल्यास, आपण त्याला प्रतिसाद देऊ नये.

आपले वापरकर्ता आयडी, पासवर्ड्स, कार्ड्स, कार्ड क्रमांक किंवा पिन कोणत्याही व्यक्तीला शेअर केल्यामुळे किंवा त्यांच्या अनधिकृत वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी कॉसमॉस बँक जबाबदार नाही.


फसवे ईमेल कसे काम करतात?

  • सामान्यतः आपल्याला एक ईमेल मिळेल जो आपल्या बँकेकडून असल्याचा दावा करेल, त्या ईमेलमध्ये (कदाचित अपडेट किंवा पुष्टीकरण प्रक्रियेचा भाग म्हणून) आपल्या सुरक्षा तपशीलांची विनंती केली जाईल किंवा आपल्याला एका साइटची लिंक फॉलो करण्यास सांगेल जिथे आपल्याला आपला क्रेडिट कार्ड नंबर, वैयक्तिक ओळख क्रमांक (पिन), पासवर्ड्स किंवा आईचे माहेरचे नाव अशी वैयक्तिक माहिती यांसारखे तपशील देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

  • लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एका बनावट वेबसाइटवर नेले जाईल, जी आपल्या बँकेसारखी दिसण्यासाठी डिझाइन केलेली आहे, पण फसवणूक करणार्‍याने व्यक्तीने चालवलेली आहे.

  • फसव्या ईमेल्स आणि वेबसाईट्स या दिसायला खूप खात्रीशीर वाटू शकतात. फसवणूक करणार्‍या व्यक्ती या आपण आपल्या खात्याचे तपशील उघड करावे, यासाठी सतत नवनवीन क्लृप्त्या शोधत असतात.

  • सर्व नको असलेले ईमेल सावधगिरीने हाताळा आणि अशा ईमेलमधील लिंक्सवर कधीही क्लिक करू नका आणि कोणतीही वैयक्तिक माहिती एंटर करू नका.

फिशिंग ईमेल

कॉसमॉस बँकेचे नाव वापरणाऱ्या संशयास्पद ईमेलची तक्रार करण्यासाठी, ते आमच्याकडे त्वरित फॉरवर्ड करा ibhelp@cosmosbank.in


फसवणूक/संशयास्पद अ‍ॅक्टिव्हिटी

फसवणुकीच्या तक्रारी देण्यासाठी, किंवा इंटरनेट बँकिंग, ई-मेल्स, आणि डेबिट कार्डशी संबंधित काही संशयास्पद घडामोडींची तक्रार देण्यासाठी, bhelp@cosmosbank.in किंवा card_dispute@cosmosbank.in या ईमेल आय डी वर संपर्क साधावा.

आपण आमच्याशी टोल फ्री फोन नंबरवर देखील संपर्क साधू शकता: 1800 233 0234

एटीएम कार्ड, डेबिट कार्ड किंवा चेक बुक हरवली किंवा चोरीला गेले

ईमेल: atmhelp@cosmosbank.in फोन नंबर: +91-20-67086708