इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं.-6, सर्वे नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

लीज रेंट डिस्काउंटिंग योजनेची आकर्षक वैशिष्ट्ये
कर्जाची मर्यादा
योजनेवर अधिकतम रकमेची मर्यादा नाही
निव्वळ भाडेपट्टीवर आधारित
कस्टमाइज करुन हवी ती कर्जाची रक्कम
दीर्घ कालावधी
भाडेपट्टी कालावधीच्या मर्यादेपर्यंत जे 15 वर्षांपेक्षा कमी असेल.

आपल्या आर्थिक आवश्यकतेनुसार आखलेली सुविधा.

कर्जाशी संबंधित ठळक मुद्दे
  • कर्जाच्या अधिकतम रकमेची गणना निव्वळ लीज रेंटच्या आधारे केली जाईल (=ईएमआय)
  • व्याजदर
    8.50%* पुढे (*अटी आणि शर्ती लागू)
  • कर्ज वितरण कालावधी
    15 दिवस
  • परतफेडीचा कालावधी
    भाडेपट्टी कालावधीच्या मर्यादेपर्यंत जे 15 वर्षांपेक्षा कमी असेल;
    डीएससीआर/परतफेड क्षमतेचे निर्धारण करण्यासाठी निव्वळ भाडेपट्टी भाड्याचा विचार केला जाईल
  • प्रीपेमेंट शुल्क
    शून्य
प्रक्रिया शुल्क
  • 0.50 % + कर्ज रकमेवर जीएसटी.
खाते मुदत पूर्व बंद करण्यासाठीचे शुल्क
  • 12 महिन्यांपर्यंत - 3%
    12 महिने ते 24 महिने- 2%
    24 महिन्यांनंतर - 1%
पात्रता
  • अधिक माहितीसाठी कृपया शाखेशी संपर्क साधा.
सुविधा
  • अर्जदाराच्या परतफेड क्षमतेवर आधारित मर्यादा ही टर्म लोन म्हणून मंजूर केली जाईल.
  • भाडेपट्ट्याने दिलेल्या जागेवर बांधकाम चालू असल्यास, जागा भाडेतत्त्वावर सुपूर्द करेपर्यंत दिले गेलेले कर्ज हे सुरुवातीच्या काळात प्रोजेक्ट फायनान्सच्या स्वरूपात असेल.
  • एकदा भाडेपट्टीचे भाडे देय झाल्यानंतर, ते टर्म लोनात रूपांतरित केले जाईल. अंतिम लीज करार सादर करण्याच्या अधीन
आवश्यक दस्तऐवज
  • केवायसी दस्तऐवज
  • पूर्ण झालेल्या आर्थिक वर्षाच्या 3 वर्षांसाठी आयटी रिटर्नसह कर्जदाराची आर्थिक कागदपत्रे.
  • व्यवसायाचे परवाने/नोंदणी
  • जामीनदाराची केवायसी आणि उत्पन्नाची कागदपत्रे
  • सिक्युरिटीबद्दलची कागदपत्रे.
  • मागील 6 -12 महिन्यांचे बँक विवरण जे खात्यातील भाड्याचे क्रेडिट दर्शवते.
  • नोंदणीकृत लीज डीडची प्रत.
  • अ‍ॅसेटच्या शीर्षक दस्तऐवजांची छायाप्रत, मंजूर प्लान

संपर्क

आमचे तज्ज्ञ तुम्हाला पुढील सहाय्यासाठी 24-48 तासांच्या आत तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करतील. कॉसमॉस बँकेत स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद.

ग्राहकांसाठी महत्वाचे
  • उच्च शिक्षण
  • विनातारण कर्जांची परतफेड
  • परदेशी व्यवसायिक भेटीवरील खर्च
  • दुसऱ्या व्यावसायिक मालमत्तेची खरेदी
  • भूखंडावरील बांधकाम
  • भाडेतत्त्वावर देण्यात येणाऱ्या भूखंडावरील बांधकाम
  • सध्याच्या अ‍ॅसेटचे नूतनीकरण ज्याला भाडेपट्टीवर दिले जाणार आहे
  • व्यवसायाची जाहिरात इ
माहीत असावे असे
  • कर्ज मर्यादा: योजनेवर अधिकतम रकमेची मर्यादा नाही
  • जामीनदार : शक्यतो बँकेला मान्य असलेले 2 जामीनदार
  • परतफेड (क्षमता): परतफेड क्षमतेसाठी निव्वळ भाडेपट्टी भाड्याचा विचार केला जाईल
  • तारण: मालमत्ता ही बांधलेल्या स्थितीत रहिवासी किंवा व्यावसायिक उद्देशासाठी अधिकृत असलेले पूर्तता प्रमाणपत्र (कंप्लिशन सर्टिफिकेट) प्राप्त झालेली असावी.

    कायदेशीर मतानुसार सर्व मूळ टायटल डीड उपलब्ध असल्यास सिंपल मॉर्टगेज पद्धतीने अ‍ॅसेट तारण ठेवता येतात.आणि नोंदणीकृत ईक्विटेबल मॉर्टगेज फक्त महाराष्ट्र राज्यात होते.
  • दस्तऐवजीकरण: भाडे थेट बँकेच्या नावे दिले जाईल असे भाडेकरूचे पत्र.
  • फॉर्म: ऑनलाइन फॉर्म सेंटरवर उपलब्ध आहे.

*अटी आणि शर्ती लागू