इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं.-6, सर्वे नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

मुदत ठेवींची आकर्षक वैशिष्ट्ये
गुंतवणूक कालावधी
मुदत ठेव ठेवण्यासाठी आपल्या पसंतीनुसार कालावधी आपण निवडू शकता.
डिपॉझिट रक्कम
किमान ठेव रक्कम रु.1000/- आणि पुढे रु. 100/- च्या पटीत असणे आवश्यक आहे
व्याजाचा पेआऊट
मासिक, त्रैमासिक आणि संचयी व्याज पर्यायांसारखे विविध पर्याय उपलब्ध आहेत.

कॉसमॉस मुदत ठेवी... जीवनी हास्य फुलवी

सर्वाधिक सुरक्षा पुरवून आपली बचत वाढवण्यासाठी आपल्याला ऑफर केलेले आणि मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे आर्थिक साधन. येथे आपण एका निश्चित कार्यकाळासाठी मोठी रक्कम जमा करू शकता. मॅचूरिटीच्या वेळी आपल्याला गुंतवलेली रक्कम आणि नियमित बचत खात्यापेक्षा जास्त व्याजदर मिळेल. आपण येथे गुंतवलेले पैसे, आपल्या आवडीच्या ठराविक कालावधीसाठी त्या वेळच्या विशिष्ट व्याजदराने लॉक केले जातात. व्याजदर किंवा मार्केटच्या परिस्थितीतील कोणत्याही बदलांचा या खात्यावर काहीही परिणाम होत नाही तसेच आपल्याला परताव्याची हमी मिळते. अशा प्रकारे आपली गुंतवणूक सुरक्षित करा.

बचत अत्यावश्यक आहे. आपल्याला आपल्या पैशांची गुंतवणूक करून नफा कमवायचा असेल तर आपण योग्य ठिकाणी आहात. कॉसमॉस आपल्याला फक्त बचत करण्यात मदत करत नाही तर 10 वर्षांपर्यंतच्या कार्यकाळासाठी उत्कृष्ट आणि आकर्षक व्याजदर देऊन, निर्धारित कालावधीसाठी ठेवलेल्या ठेवींवर आपली बचत वाढण्यास मदत करते. आपण नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडी वापरून मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक आधारावर पैसे कमवू शकता.

संचयी (क्युम्युलेटिव्ह) एफडी आपले व्याज हे मुदतीनुसार चक्रवाढीने वाढवते आणि मुदत संपताना किंवा मुदत कालावधी पूर्ण झाल्यावर परतफेड करते.

आम्ही ही योजना व्यक्ती (एकल/संयुक्त), पालकांतर्फे अल्पवयीन मुलांसाठी, संघटना, सहकारी संस्थांना ऑफर करतो.

पात्रता
  • वैयक्तिक (सिंगल/जॉइंट), मायनर चे त्यांच्या देखभालकर्त्याकडून, संस्था, सहकारी सोसायट्या
सुविधा
  • ऑटो रिन्युअल सुविधा उपलब्ध
आवश्यक दस्तऐवज
  • केवायसी दस्तऐवज हे मार्गदर्शक तत्वांनुसार.

संपर्क

आमचे तज्ज्ञ तुम्हाला पुढील सहाय्यासाठी 24-48 तासांच्या आत तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करतील. कॉसमॉस बँकेत स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद.

ग्राहकांसाठी महत्वाचे
  • कोणीही ज्यांना आपले पैसे गुंतवून नफा कमवायचा आहे.
माहीत असावे असे
  • किमान रक्कम रु. 1000 आणि त्यानंतर रु. 100/- च्या पटीत
  • कमाल ठेव कालावधी - 10 वर्षे.
  • आयकर कायदा 1961. नुसार टीडीएस लागू होईल
  • टीडीएसच्या सवलतीसाठी फॉर्म 15एच/15जी दाखल करणे आवश्यक आहे
  • बँक जास्तीत जास्त 10 वर्षांच्या कालावधीसाठी आकर्षक व्याजदर देते.

*अटी आणि शर्ती लागू