<img height="1" width="1" style="display: none" src="https://www.facebook.com/tr?id=1773580009503867&amp;ev=PageView&amp;noscript=1">

इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं-6, सर्वे.नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

प्रत्येक भारतीयाचा अभिमान

हे राष्ट्रीय पेमेंट कार्ड नेटवर्क संपूर्ण भारतभर एटीएम, पीओएस डिव्हाइसेस आणि ई-कॉमर्स वेबसाइटवर मोठ्या प्रमाणावर स्वीकारले जाते.

आपल्याला अनेक विशेष प्रीमियम सेवा देणारे रूपे प्लॅटिनम डेबिट कार्ड कॉसमॉस बँक प्रस्तुत करते. हे डेबिट कार्ड सर्व बँक एटीएम, भारतभरातील व्यापाऱ्यांचे असंख्य पीओएस टर्मिनल, ऑनलाइन शॉपिंग ई-कॉमर्स व्यवहार आणि विविध पेमेंटसाठी उपलब्ध करून दिले गेले आहे.

कार्डची विशेषता

  1. बँकेचा लोगो असलेली कार्डची विशेष ओळख
  2. कार्डच्या वापरासाठी आकर्षक मर्यादा
  3. ग्राहक स्वतः त्याच्या कार्डचे व्यवस्थापन करू शकतो
  4. चिप आणि पिनच्या सुरक्षिततेसह डेबिट कार्ड
  5. कॉसमॉस एटीएमवर ग्रीन पिन सुविधेचा वापर करून त्वरित डेबिट कार्ड पिन मिळवा.
  6. कॉसमॉस बँकेच्या सर्व एटीएमवर विनामूल्य आणि अमर्यादित एटीएम सुविधेचा वापर.

आपले कार्ड स्वतः नियंत्रित करा:

  1. लिमिट मॅनेजमेंट - कॉसमॉस इंटरनेट बँकिंग/मोबाईल बँकिंग अ‍ॅप्लिकेशन वापरून गरजेनुसार ग्राहक त्यांची दैनंदिन लिमिट सेट करू शकतात
  2. चॅनल मॅनेजमेंट - एटीएम, पीओएस (पॉइंट ऑफ सेल) आणि ई-कॉमर्स यांसारख्या विशिष्ट चॅनेलवर सुरक्षिततेसाठी ग्राहक स्वत: कार्डचा वापर सक्षम/अक्षम करू शकतात.
  3. कार्ड तात्पुरते ब्लॉक / अनब्लॉक करा - कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी ग्राहक तात्पुरते त्यांचे कार्ड ब्लॉक आणि अनब्लॉक करू शकतात.
  4. कार्ड्स हॉटलिस्ट करणे - आपली कार्ड्स चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास खाली दाखवलेल्या फॉर्मेटमध्ये फक्त 9225677755 वर एसएमएस पाठवा.
  5. BLOCKXXXX (तुमच्या खाते क्रमांकाचे शेवटचे 4 अंक)
  6. STOPXXXX (तुमच्या कार्ड क्रमांकाचे शेवटचे 4 अंक)
  7. पीओएस आणि ई-कॉमची एकत्रित खरेदी मर्यादा ही दैनंदिन खरेदी मर्यादा मानली जाईल
  8. मर्चंट पार्टनर्सवर आकर्षक ऑफर्स/डिस्काउंट. अधिक माहितीसाठी कृपया https://www.rupay.co.in/our-cards/rupay-debit/rupay-platinum व्हिजिट करा

रूपे कार्डचे दोन प्रकार आहेत:

1. रूपे प्लॅटिनम कॉन्टॅक्टलेस कार्ड :
विशेष वैशिष्ट्ये :-

  • प्रति कार्ड प्रति कॅलेंडर तिमाहीत 1-वेळा मोफत देशांतर्गत लाउंज प्रवेश.
  • रू.2,00,000/- पर्यंतचे वैयक्तिक अपघाती विमा (अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व) कव्हर
एटीएम मधून पैसे काढणे पीओएस (स्वाईप) ई-कॉम (ऑनलाइन व्यवहार) कॉन्टॅक्टलेस
रू. 25,000/- रू. 1,00,000/- रू. 1,00,000/- रू. 5,000/-

2. रूपे सिलेक्ट इंटरनॅशनल डेबिट कार्ड :
विशेष वैशिष्ट्ये :-

  • देशांतर्गत विमानतळ आणि रेल्वे याठिकाणी लाउंज प्रवेश.
  • आंतरराष्ट्रीय विमानतळ लाउंज प्रवेश.
  • अपघाती विमा आणि कायमस्वरूपी अपंगत्वासाठी रू. 10.00लाखांपर्यंत कव्हर.
  • जिम/स्पा/गोल्फ/आरोग्य तपासणी/ओटीटी ॲक्सेस इत्यादी.
  • या सुविधांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाने स्वतःला या URL वर ऑनबोर्ड करणे आवश्यक आहे: https://www.rupay.co.in/our-cards/rupay-debit/rupay-select
एटीएम मधून पैसे काढणे पीओएस (स्वाईप) ई-कॉम (ऑनलाइन व्यवहार) कॉन्टॅक्टलेस
रू. 1,00,000/- रू. 2,00,000/- रू. 2,00,000/- रू. 5,000/-

लागू असणारे शुल्क :-

अनु. क्र. उत्पादन वर्णन एएमसी शुल्क एएमसी शुल्क आकारणी
01. रूपे प्लॅटिनम कॉन्टॅक्टलेस Rs.150/-+GST 1 वर्षापर्यंत विनामूल्य
02. रूपे सिलेक्ट इंटरनॅशनल कार्ड Rs.500/- +GST कार्ड इश्यू करतांना शुल्क अगोदर वसूल केले जाईल.

कृपया लक्षात घ्या रूपे (RuPay) डेबिट कार्डची वरील विशेष सुविधा वेळोवेळी बदलू शकते, सुविधांच्या अधिक माहितीसाठी URL ला भेट द्या https://rupay.co.in

कार्डचे विविध प्रकार : -


एटीएम शुल्क : -


तपशील

तपशील -

माहिती असावे असे: -

संपर्क

आपण दिलेल्या नंबरवर 24-48 तासांच्या आत आपल्याला मदत करण्यासाठी आमचे तज्ञ आपल्याला कॉल बॅक करतील. कॉसमॉस बँकेची निवड केल्याबद्दल धन्यवाद