इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं.-6, सर्वे नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

स्वयं सहाय्यता समूह/संयुक्त दायित्व गट साठी कर्ज योजनेची आकर्षक वैशिष्ट्ये
कोणतीही स्टँप ड्युटी नाही
या योजनेतून स्टँप ड्युटीत सूट देण्यात आली आहे
मोरॅटोरियम कालावधी
गरजेनुसार मोरॅटोरियम कालावधी
किमान मार्जिन
कर्जाची पात्रता स्वयं सहाय्यता समूहाच्या बचत रकमेवर अवलंबून आहे हे लक्षात घेऊन कोणत्याही मार्जिनची आवश्यकता नाही. संयुक्त दायित्व गटासाठी- प्रत्येक सदस्याप्रती रु.50000/- पर्यंतच्या कर्जासाठी मार्जिन आवश्यक नाही. प्रत्येक सदस्याप्रती रु. 50000/- पेक्षा जास्त कर्जासाठी बँकेच्या नावे 10 % मार्जिन आवश्यक असेल.

स्वयं सहाय्यता समूह/संयुक्त दायित्व गट यांच्यासाठी यशाचा महामार्ग

एखादे छोटे अर्थसहाय्य सुद्धा मोठा व्यवसाय करण्यास उपयुक्त ठरते. क्रेडिट धोरणानुसार कोणत्याही उत्पादक/उत्पन्नाच्या उद्देशासाठी स्वयं सहाय्यता समूह/संयुक्त दायित्व गट प्रगतीसाठी हे कर्ज घेऊ शकतात.

सदस्यांमध्ये बचत करण्याच्या सवयीला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींचे स्वयं सहाय्यता समूह हे औपचारिक किंवा अनौपचारिक असे लहान गट आहेत. गटाद्वारे सदस्यांना उत्पन्नाच्या उद्देशाने आणि गरजू सदस्याला आर्थिक सहाय्य देण्यासाठी या बचती नंतर दिल्या जातात. या गटाने नेहमी योग्य खाती आणि नोंदी ठेवणे आवश्यक आहेत, संयुक्त दायित्व गट हा अशाच प्रकारच्या आर्थिक कृतींसाठी परस्पर हमी देऊन एकट्याने किंवा सामुहिक यंत्रणेने बँक कर्ज मिळविण्याच्या हेतूने एकत्र येत असलेल्या व्यक्तींचा एक अनौपचारिक गट आहे.

कर्जाशी संबंधित ठळक मुद्दे
  • कर्जाची मर्यादा
    स्वयं सहाय्यता समूह च्या बाबतीत - समुहस्थापनेपासून आजपर्यंत जमा झालेल्या गटाच्या बचतीच्या कमाल कर्ज मर्यादा 4 पटींपेक्षा अधिक असता कामा नये (गटाचे बँकेतील खाते किमान 6 महिने सुरू असणे आवश्यक आहे.)
    संयुक्त दायित्व गटाच्या बाबतीत - अधिकाधिक रु.1,00,000/- पर्यंत गटातील प्रति सदस्य.
  • व्याजदर
    स्वयं सहाय्यता समूह - 12.50 %* प्रती वर्ष
    संयुक्त दायित्व गट - 24.00 %* प्रती वर्ष
  • कर्ज वितरण कालावधी
    2 दिवसांच्या आत सर्व आवश्यक दस्तऐवजांच्या सर्व पावत्या आवश्यक
  • परतफेडीचा कालावधी
    प्रस्तावाच्या गुणवत्तेनुसार 1-3 वर्षे.
  • प्रीपेमेंट शुल्क
    शून्य
प्रक्रिया शुल्क
  • स्वयं सहाय्यता समूह – कर्ज रकमेच्या 0.10 % + GST
  • संयुक्त दायित्व गट – रु.25,000/- - पर्यंत - 0% प्रक्रिया शुल्क
    रु.25000/- - च्या वर असल्यास - कर्ज रकमेच्या 1%
खाते मुदत पूर्व बंद करण्यासाठीचे शुल्क
  • शून्य
पात्रता
  • अर्जदार समूह हा बँकेचा नियमित किंवा नाममात्र सदस्य होईल. कर्ज थेट स्वयं सहाय्यता समूह/संयुक्त दायित्व गट ला दिले जाईल, मध्यस्थांद्वारे दिले जाणार नाही.
सुविधा
  • विमा:ग्रुप सुरक्षा (ग्रुप क्रेडिट प्रोटेक्शन प्लॅन) अंतर्गत विमा कव्हर कर्ज घेणाऱ्या गटाच्या सदस्यांना दिले जाईल.
आवश्यक दस्तऐवज
  • अधिक तपशिलांसाठी 020-24409212/216 /209/264/211 वर आर्थिक समावेशन कक्षाशी संपर्क साधा.

संपर्क

आमचे तज्ज्ञ तुम्हाला पुढील सहाय्यासाठी 24-48 तासांच्या आत तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करतील. कॉसमॉस बँकेत स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद.

ग्राहकांसाठी महत्वाचे
  • क्रेडिट पॉलिसीनुसार कोणतेही उत्पादक/उत्पन्न निर्मिती उद्देश
माहीत असावे असे
  • तारण: स्वयं सहाय्यता समूहांसाठी सुरक्षितता आवश्यक कर्जाच्या रकमेनुसार ठरवली जाईल. स्वयं सहाय्यता समूहाच्या सदस्यांची वैयक्तिक हमी आणि तयार केली जाणारी मालमत्ता ही रु.5 लाख आणि त्याहून कमी रकमेच्या कर्जासाठीची सिक्युरिटी असेल. सिक्युरिटी ची आवश्यकता रु. 5 लाख पेक्षा अधिक कर्जासाठी लागू होईल.
  • सदस्यत्व शेअर/लिंकिंग: सदस्यत्व लागू होईल.

    बँकेच्या उपविधींनुसार गट सदस्यांच्या नावाने सभासदत्व संयुक्तपणे असेल.

    पहिल्या सदस्याला मतदानाचा अधिकार असेल.

    सर्व गट सदस्य बँकेचे नाममात्र सदस्य बनतील.
  • बचत खाते: स्वयं सहाय्यता समूह/संयुक्त दायित्व गट चे सर्व सदस्य सर्व केवायसी नियमांचे पालन करून बँकेत बचत खाते उघडतील आणि त्याच बचत खात्यातून सर्व व्यवहार करतील.
  • निधीचा अंतिम वापर: कर्जाच्या उद्देशानुसार, कर्जदाराची किंवा संपूर्ण गटाची घोषणा/कागदपत्रे आवश्यक आहेत
  • करार आणि प्रक्रिया शुल्क: शुल्कासाठी, येथे क्लिक करा
  • जामीनदार : गटातील सर्व सदस्य जामीनदार असतील
  • इतर तपशील: गटाला संयुक्त सदस्यत्व देणे आवश्यक आहे

    गटातील पहिल्या सदस्याला मतदानाचा अधिकार देणे आवश्यक आहे.

    कोणतीही स्टँप ड्युटी नाही - स्वयं सहाय्यता समूह साठी सरकारी जीआर नुसार सूट. संयुक्त दायित्व गट साठी धोरणानुसार आवश्यक मुद्रांक शुल्क लागू केले जाईल.
  • फॉर्म: ऑनलाइन फॉर्म सेंटरवर उपलब्ध आहे.

*अटी आणि शर्ती लागू