<img height="1" width="1" style="display: none" src="https://www.facebook.com/tr?id=1773580009503867&amp;ev=PageView&amp;noscript=1">

इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं-6, सर्वे.नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

प्रवास सुखकर झाला

भारत सरकारद्वारे राष्ट्रीय महामार्गावरील सुखकर प्रवासासाठी आदर्श उपाय. कॉसमॉस बँक आपल्याला वापरण्यास सोपा एनइटीसी फास्टॅग प्रदान करते जे आपल्या बँक खात्यातून टोल शुल्काची आपोआप कपात करण्याची अनुमती देते आणि आपल्याला रोख व्यवहारासाठी न थांबता टोल प्लाझातून प्रवास करण्याची अनुमती देते.

कॉसमॉस बँक एनइटीसी फास्टॅग शी लिंक असलेल्या आपल्या खात्यातून लागू टोल शुल्क रक्कम डेबिट होते. टॅगमध्ये रेडिओ-फ्रिक्वेंसी आयडी (आरएफआयडी) तंत्रज्ञान वापरले जाते आणि टॅग खाते सक्रिय झाल्यानंतर वाहनाच्या विंडस्क्रीनवर चिकटवले जाते.

एनइटीसी ची कल्पना

एनइटीसी फास्टॅग हा भारत सरकारचा भारतातील महामार्ग नेटवर्क तयार आणि विकसित करण्याचा एक उपक्रम आहे. मोठ्या प्रमाणावर टोल वसुली केंद्रे स्थापन करण्याच्या गरजेवर जोर देण्यात आला आहे, ज्यामुळे देशाच्या महामार्ग नेटवर्कवर स्वयंचलित आणि इंटरऑपरेबल इलेक्ट्रॉनिक टोलिंग संरचना तयार करण्यासाठी एक फ्रेमवर्क बनते.

इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लि.(आयएचएमसीएल) आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ने भारतीय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ला इलेक्ट्रॉनिक टोल वसुलीसाठी संपूर्ण प्रणाली प्रदान करण्यासाठी अधिकृत केले आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ने आयएचएमसीएल ला राष्ट्रीय महामार्गांच्या टोल प्लाझावरील इलेक्ट्रॉनिक टोल वसुली प्रणाली लागू करण्याची जबाबदारी दिली आहे. सध्या 800+ पेक्षा जास्त (नॅशनल प्लाझाची संख्या 702, आहे, 108 स्टेट प्लाझा आहेत आणि 25 सिटी प्लाझा) टोल प्लाझा एनइटीसी शी जोडलेले आहेत.

एनइटीसी फास्टॅग म्हणजे काय?

एनइटीसी फास्टॅग हे एक पॅसीव्ह टॅग-सारखे उपकरण आहे जे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडी (आरएफआयडी) तंत्रज्ञानाचा वापर करून आपले वाहन चालू असताना थेट आपल्या लिंक केलेल्या प्रीपेड किंवा बचत/चालू खात्यातून टोल भरते. वाहनाच्या विंडस्क्रीनला जोडलेला टॅग आपल्याला लिंक केलेल्या खात्यातून थेट टोल भरण्याची अनुमती देतो.

राष्ट्रीय महामार्गावर तणाव-मुक्त प्रवासासाठी एनइटीसी फास्टॅग हा एक आदर्श उपाय आहे. हे सध्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांसह 800+ पेक्षा जास्त (नॅशनल प्लाझाची संख्या 702, आहे, 108 स्टेट प्लाझा आहेत आणि 25 सिटी प्लाझा) टोल प्लाझावर वापरत आहेत. एनइटीसी फास्टॅग कार्यक्रमाचा भाग म्हणून भविष्यात अजून टोल प्लाझा समाविष्ट होतील.

खास वैशिष्ट्ये

  • सुलभ पेमेंट
  • टोल व्यवहारासाठी रोख रक्कम बाळगण्याची गरज नाही.
  • अशाप्रकारे टोलच्या रांगेत वाट न पाहता वेळेची बचत होते.
  • टोल व्यवहारांसाठी एसएमएस अलर्ट इत्यादी
  • सुरक्षित आणि विश्वसनीय व्यवहार.
  • ग्राहकांसाठी ऑनलाइन पोर्टल.
  • आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 90290 13793 वर मिस कॉल देऊन आपल्या खात्यातील शिल्लक तपासा.

तपशील

तपशील/माहीत असावे असे: -

दस्तऐवज आणि शुल्क: -

एनइटीसी फास्टॅग साठी अर्ज करण्यासाठी कोणते दस्तऐवज आवश्यक आहेत?

एनइटीसी फास्टॅग साठी केलेल्या अर्जासह आपल्याला खालील दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे:

  1. वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (आरसी)
  2. वाहन मालकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  3. वाहन मालकाच्या श्रेणीवर आधारित टॅगसह लिंक केलेले बँक खाते उघडण्यासाठी केवायसी दस्तऐवज:

वैयक्तिक: दिलेल्या यादीतील ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा आणि 1 पासपोर्ट आकाराचा फोटो

वाहन चालविण्याचा परवाना मतदार ओळख पत्र
पॅन कार्ड पत्त्यासह आधार कार्ड
पासपोर्ट  

कॉर्पोरेट:

पब्लिक लि./ प्रायव्हेट लि./ पार्टनरशिप प्रोप्रायटरशिप
सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन/ भागीदारी करार/
फर्मचे नोंदणी प्रमाणपत्र
मालकाचे पॅन कार्ड
कॉर्पोरेटचे पॅन कार्ड मालकाच्या पत्त्याचा पुरावा
सही करणाऱ्या अधिकाऱ्याचा फोटो आयडी शॉप अ‍ॅक्ट किंवा इतर पक्का पुरावा
पत्ते/नाव यासह संचालकांची यादी आणि
भागीदारांचे पत्ते
बँकेने विचारल्यास इतर कोणतेही दस्तऐवज

आमचा प्रतिनिधी आपल्याला एक अर्ज देईल, जो आपल्याला भरायचा आहे आणि दाखल करायचा आहे. एनइटीसी फास्टॅग साठी लागणारे सर्व दस्तऐवज वाहन मालकाच्या नावावर असावेत.

कॉसमॉस बँक एनइटीसी फास्टॅग चे शुल्क?

तपशील रक्कम (रुपये)
टॅग जॉईनिंग फी (एक-वेळ शुल्क) 100/- (सर्व लागू करांसह)
पुन्हा जारी करण्याचे शुल्क 100/- (सर्व लागू करांसह)

वाहन वर्ग विवरण थ्रेशोल्ड रक्कम
(रु. मध्ये)
सेक्युरिटी डिपॉझिट
4 कार / जीप / व्हॅन / टाटा एस आणि
तत्सम मिनी लाइट कमर्शियल
0 300
5 लाइट कमर्शियल
वाहन 2-अ‍ॅक्सल
500 500
6 बस– 3 अ‍ॅक्सल 750 750
6 ट्रक - 3 अ‍ॅक्सल 750 750
7 बस 2 अ‍ॅक्सल / मिनी बस,
ट्रक 2 अ‍ॅक्सल
500 500
12 ट्रॅक्टर / ट्रेलरसह ट्रॅक्टर,
ट्रक 4, 5 आणि 6-अ‍ॅक्सल
1000 1000
15 ट्रक 7-अ‍ॅक्सल आणि त्यावरील 1500 1500
16 अर्थ मुविंग / अवजड
बांधकाम मशीनरी
1500 1500

 

आमच्याशी संपर्क साधा

एनइटीसी फास्टॅग हेल्पलाइन क्र. – कॉसमॉस बँक टोल-फ्री 1800 233 0234

नोडल अधिकारी – श्री. प्रकाश चौधरी यांचा ईमेल आयडी- fastaghelp@cosmosbank.in

हेल्पलाइन क्र. - मोर्थ/एनएचएआय/एचएमसीएल ने टोल प्लाझा स्तरावर फास्टॅग तक्रारींचे निराकरण करण्यासाठी 1033 हेल्पलाइन नंबर लॉंच केला आहे. खालील समस्यांसाठी ग्राहक आपल्या \मोबाइल/लँडलाइनवरून 1033 सहज डायल करू शकतात:

  1. टॅग ब्लॅकलिस्टच्या कारणास्तव प्लाझा येथे थांबविण्यात आले, जरी टॅग ब्लॅकलिस्ट मध्ये नाही.
  2. प्लाझा एनइटीसी फास्टॅग स्वीकारत नाही.
  3. प्लाझा टॅग वाचू शकत नाही.
  4. प्लाझा मासिक पास जारी करण्यासाठी मदत करत नाही.
  5. एनइटीसी फास्टॅग साठी इतर कोणत्याही लागू समस्या

एनइटीसी फास्टॅग वारंवार विचारले जाणारे प्रश्न: -

*खालील नमूद केलेले प्रश्न आणि उत्तरे ही केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आलेली आहेत. ती माहिती प्रत्येक परिस्थितीतमध्ये अचूकपणे लागू असेलच असे नाही. ही माहिती म्हणजे कायदेशीर सल्ला नाही, आणि एखाद्या विशिष्ट प्रकरणात त्या महितीला बँक कायदेशीररित्या बांधील असणार नाही.

 

एनइटीसी फास्टॅग म्हणजे काय?

 

एनइटीसी फास्टॅग हे एक साधन आहे जे त्याच्याशी जोडलेल्या चालू खात्यातून थेट टोल पेमेंट करण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडी (आरएफआयडी) तंत्रज्ञान वापरते. हे आपल्या वाहनाच्या विंडस्क्रीनला लावलेले आहे आणि टोल प्लाझातून आपल्याला रोख व्यवहारांसाठी न थांबता गाडी चालवण्याची परवानगी देते.

कोणते रस्ते टॅग वापरण्याची अनुमती देतात?

एनइटीसी फास्टॅग सध्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील 800 +(नॅशनल प्लाझाची संख्या 702, आहे, 108 स्टेट प्लाझा आहेत आणि 25 सिटी प्लाझा) टोल प्लाझावर चालू आहे. भविष्यात, एनइटीसी फास्टॅग कार्यक्रमात अजून टोल प्लाझा समाविष्ट होतील.

 

एनइटीसी फास्टॅग साठी काय शुल्क आहे?

एनइटीसी फास्टॅग मध्ये टॅग जारी करण्यासाठी एक-वेळेचे शुल्क आहे. याशिवाय, परत करण्यासारख्या सुरक्षा ठेव, जी वाहनाच्या प्रकारानुसार बदलते, ती बँकेकडे ठेवली पाहिजे. कृपया अधिक माहितीसाठी शुल्क विभाग पहा.

खात्यासाठी किमान शिल्लक गरजेची आहे का?

होय, चालू खात्यासाठी किमान शिल्लक रुपये 5000/- असेल आणि बचत खात्यासाठी किमान रक्कम रुपये 1000/-. आहे. आपल्या वाहन वर्गानुसार खात्यातील शिल्लक थ्रेशोल्डपेक्षा कमी असल्यास, वर नमूद केलेल्या खात्याशी लिंक असलेले सर्व टॅग कमी शिल्लक आहेत म्हणून चिन्हांकित केले जातील आणि सर्व टॅगसाठी ऑटो-डेबिट सुविधा काढली जाईल, ज्यामुळे ग्राहकांना टोल रोख रक्कम देऊन भरावा लागेल.

जेव्हा खात्यातील शिल्लक आवश्यक थ्रेशोल्डपेक्षा जास्त होते, तेव्हा सर्व टॅग्ससाठी ऑटो-डेबिट सुविधा त्वरित सुरू केली जाते.

टॅग चार्जेस खालीलप्रमाणे आहेत

तपशील रक्कम (रुपये)
टॅग जॉईनिंग फी (एक-वेळ शुल्क) 100/- (सर्व लागू करांसह)
पुन्हा जारी करण्याचे शुल्क 100/- (सर्व लागू करांसह)
वाहन वर्ग विवरण थ्रेशोल्ड रक्कम
(रु. मध्ये)
सेक्युरिटी डिपॉझिट
4 कार / जीप / व्हॅन / टाटा एस आणि
तत्सम मिनी लाइट कमर्शियल
0 300
5 लाइट कमर्शियल
वाहन 2-अ‍ॅक्सल
500 500
6 बस– 3 अ‍ॅक्सल 750 750
6 ट्रक - 3 अ‍ॅक्सल 750 750
7 बस 2 अ‍ॅक्सल / मिनी बस,
ट्रक 2 अ‍ॅक्सल
500 500
12 ट्रॅक्टर / ट्रेलरसह ट्रॅक्टर,
ट्रक 4, 5 आणि 6-अ‍ॅक्सल
1000 1000
15 ट्रक 7-अ‍ॅक्सल आणि त्यावरील 1500 1500
16 अर्थ मुविंग / अवजड
बांधकाम मशीनरी
1500 1500

मी एनइटीसी फास्टॅग कसा खरेदी करू शकतो?

आपण कॉसमॉस बँकेच्या कोणत्याही शाखेला भेट देऊ शकता. (जवळची शाखा शोधा)कृपया आपले वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) आणि पासपोर्ट आकाराचा फोटो शाखेत घेऊन या, जेणेकरून आम्ही आपल्याला शक्य तितक्या लवकर टॅग जारी करू शकतो. बँकेत आपले बचत खाते असल्यास, आपण ते खाते एनइटीसी फास्टॅग शी लिंक करू शकता. आपला बँकेचे ग्राहक नसल्यास, बचत खाते उघडण्याचा फॉर्म बद्दल चौकशी करा आणि खाते त्वरित उघडा. क्लिक करा येथे अटी आणि नियम पाहण्यासाठी.

एनइटीसी फास्टॅग साठी अर्ज करण्यासाठी कोणते दस्तऐवज आवश्यक आहेत??

आपल्याला आपल्या केवायसी दस्तऐवजांची मूळ प्रत तसेच फोटोकॉपी सोबत ठेवावी लागेल. एनइटीसी फास्टॅग साठी केलेल्या अर्जासह आपल्याला खालील दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे:

  1. वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (आरसी)
  2. वाहन मालकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  3. वाहन मालकाच्या श्रेणीवर आधारित टॅगसह लिंक केलेले बँक खाते उघडण्यासाठी केवायसी दस्तऐवज:
    वैयक्तिक: दिलेल्या यादीतील ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा आणि 1 पासपोर्ट आकाराचा फोटो
वाहन चालविण्याचा परवाना मतदार ओळख पत्र
पॅन कार्ड पत्त्यासह आधार कार्ड
पासपोर्ट  

कॉर्पोरेट:

पब्लिक लि./ प्रायव्हेट लि./ पार्टनरशिप प्रोप्रायटरशिप
सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन/ भागीदारी करार/
फर्मचे नोंदणी प्रमाणपत्र
मालकाचे पॅन कार्ड
कॉर्पोरेटचे पॅन कार्ड मालकाच्या पत्त्याचा पुरावा
सही करणाऱ्या अधिकाऱ्याचा फोटो आयडी शॉप अ‍ॅक्ट किंवा इतर पक्का पुरावा
पत्ते/नाव यासह संचालकांची यादी आणि
भागीदारांचे पत्ते
बँकेने विचारल्यास इतर कोणतेही दस्तऐवज

आमचा प्रतिनिधी आपल्याला एक अर्ज देईल, जो आपल्याला भरायचा आहे आणि दाखल करायचा आहे.
एनइटीसी फास्टॅग साठी लागणारे सर्व दस्तऐवज वाहन मालकाच्या नावावर असावेत.

एनइटीसी फास्टॅग साठी मला टोल प्लाझावर एखादी विशिष्ट लेन वापरायची आहे का?

होय, आपल्याला टोल प्लाझावर एनइटीसी फास्टॅग साठी ठरवण्यात आलेल्या लेनचा वापर करावा लागेल.

मी स्वतःसाठी मासिक पास घेऊ शकतो का?

मासिक पास सुविधा प्रत्येक टोल प्लाझासाठी विशिष्ट आहे.
येथे क्लिक करा मासिक पास सुविधेचा लाभ मिळण्यासाठी

माझ्याकडे दोन वाहने आहेत, दोन्हीसाठी एक एनइटीसी फास्टॅग वापरता येईल का?

नाही, आपल्याला दोन वाहनांसाठी दोन स्वतंत्र एनइटीसी फास्टॅग खरेदी करावे लागतील.

माझ्या कॉसमॉस एनइटीसी फास्टॅग खात्यातून योग्य युझर फी डेबिट झाली आहे हे मला कसे कळेल?

प्रत्येक वेळी आपल्या एनइटीसी फास्टॅग लिंक केलेल्या कॉसमॉस बँक खात्यातून रक्कम वजा केली जाईल तेव्हा आपल्याला आपल्या नोंदणीकृत फोन नंबरवर एसएमएस अलर्ट येईल.

मी चुकीच्या वजा झालेल्या रक्कमेची तक्रार कशी नोंदवू आणि मला ती परत कशी मिळेल?

आमच्या कॉल सेंटरवर आम्हाला कॉल करून आपण चुकीच्या वजा झालेल्या रकमेबद्दल तक्रार करू शकता.विवादाची योग्य पडताळणी आणि ऑथेंटिकेशन केल्यानंतर,ती रक्कम आपल्या टॅग-लिंक केलेल्या कॉसमॉस बँक खात्यात परत जमा केले जाईल.

जर माझा टॅग हरवला/त्याचे नुकसान झाले तर मी माझे एनइटीसी फास्टॅग खाते कसे ब्लॉक करू?

आपण कॉसमॉस बँक कस्टमर केअर नंबरवर कॉल करू शकता आणि आपला एनइटीसी फास्टॅग ब्लॉक करू शकता. आपण आपल्या टॅग खात्याशी लिंक केलेला नवीन टॅग जारी करण्याविषयी विनंती करू शकता.

एनइटीसी फास्टॅग चा वापर राज्य महामार्गावरील टोल प्लाझामधून जाण्यासाठी केला जाऊ शकतो का?

एनइटीसी फास्टॅग सध्या फक्त राष्ट्रीय महामार्गावरील 800 + (नॅशनल प्लाझाची संख्या 702, आहे, 108 स्टेट प्लाझा आहेत आणि 25 सिटी प्लाझा) टोल प्लाझावर चालू आहे जेथे ते लागू केले गेले आहे. भविष्यात, अधिक टोल प्लाझा या कार्यक्रमाच्या कक्षेत आणण्यात येतील.

माझ्याकडे एनइटीसी फास्टॅग आहे आणि शिल्लक रक्कम देखील आहे, पण मी इटीसी लेनमधून जाऊ शकलो नाही. मी माझा एनइटीसी फास्टॅग सक्रीय आहे का नाही ते पाहण्यासाठी कसा तपासायचा/ दुरुस्त करायचा?

आपण आमच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून याबाबत विनंती करू शकता किंवा कॉसमॉस बँकेने प्रदान केलेल्या ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या ऑनलाइन पोर्टलवर आपण ते तपासू शकता.

मी विशिष्ट टोल प्लाझाच्या 20 कि.मी. च्या आत राहतो. स्थानिक वाहनांसाठी असलेल्या सवलती मिळविण्यासाठी मला एनइटीसी फास्टॅग घेण्याची आवश्यकता आहे का?

विशिष्ट प्लाझाच्या 10कि.मी.च्या आत आपले घर असल्याचे प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्याकडे आपले दस्तऐवज दाखल करणे आवश्यक आहे. एकदा ते सत्यापित झाल्यानंतर, आपण आपल्या वाहनाला नियुक्त केलेल्या एनइटीसी फास्टॅग वर सवलत घेऊ शकता.

वेगवेगळ्या वाहन श्रेणींसाठी दर वेगळे का आहेत?

रस्ता वापरणाऱ्यांच्या हितासाठी वाहनांना वर्गीकृत केले जाते. रस्ता वापरकर्ते वाहून नेतात तो बोजा आणि त्याचा आकार आणि वाहनाच्या वापराचा प्रकार आणि त्यांच्यामुळे रस्त्याची होणारी झीज (व्यावसायिक/वैयक्तिक) यानुसार हे वर्गीकरण केले जाते.

स्थानिक आणि वारंवार रस्ता वापरणाऱ्यांसाठी वेगळ्या काय सवलती आहेत?

स्थानिक/वारंवार रस्ता वापरणाऱ्यांसाठी ही सवलत कल्याणकारी उपाय म्हणून देण्यात आली आहे. या सवलती कराराच्या विविध शुल्क नियम आणि तरतुदींनुसार वेगवेगळ्या वेळी दिल्या जात असल्यामुळे त्यांच्या उपलब्धतेमध्ये तफावत येऊ शकते.

आम्ही प्रकल्पांतर्गत रस्त्यावरून थोडेच अंतर प्रवास असतो तरी आम्हाला संपूर्ण युझर फी (टोल) का भरावे लागते?

भारतात, सर्वसाधारणपणे टोल खुल्या प्रणालीत असतात, जिथे देय शुल्क किवा रक्कम ही एका प्रकल्पाच्या लांबीनुसार ठरवली गेलेली एक निश्चित रक्कम असते जी साधारणपणे 60 प्रति किलोमीटर अशी मोजली जाते. जर रस्त्यावरील प्रवास कमी लांबीचा असेल तर वापरकर्ता पार करणार असलेल्या वास्तविक अंतरानुसार शुल्क किंवा टोलची रक्कम संकलित केली जाते.

दोन टोल प्लाझांमधील किमान अंतर सामान्यपणे किती असते?

टोल शुल्काच्या नियमांनुसार 2008, दोन लगतच्या टोल प्लाझांमधील अंतर 60 किमी असणे आवश्यक आहे.

टोल वसुली कर्मचारी वर्गाचा छळ/ गैरवर्तन/ असभ्य/ अशिष्ट वर्तन झाल्यास, आम्ही काय करणे आवश्यक आहे?

अशा परिस्थिति मध्ये,टोल प्लाझाच्या संबंधित प्रकल्प संचालकांकडे तक्रार नोंदवणे आवश्यक असेल.

2 या टोल प्लाझांवर युझर फीचा (टोल) दर वेगळा का आहे?

एखाद्या विशिष्ट टोल प्लाझा अंतर्गत लांबीचा विस्तार, संरचना (पूल, बोगदा आणि बायपास) आणि महामार्गांची रुंदी, लागू शुल्कांचे नियम आणि सवलतीबाबतच्या कराराच्या तरतुदींनुसार त्या प्लाझावरील टोल फी असते.

माझ्या कासा खात्याची शिल्लक मी कशी प्राप्त करू शकेन?

बँकेने त्याच्या/तिच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून विशिष्ट क्रमांकावर फक्त मिस्ड कॉल देऊन तात्काळ खात्यातील शिल्लक मिळविण्यासाठी मिस्ड कॉलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
पूर्व-आवश्यकता:

ग्राहकाचा मोबाइल क्रमांक बँकेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

मिस्ड कॉलसाठी निर्दिष्ट नंबर: 90290 13793.
महत्वाची वैशिष्ट्ये:

  • 24*7. सेवा उपलब्ध आहे
  • ग्राहकांसाठी विनामूल्य सेवा.
  • सेवा केवळ कासा खात्यांसाठी उपलब्ध आहे.

संपर्क

आपण दिलेल्या नंबरवर 24-48 तासांच्या आत आपल्याला मदत करण्यासाठी आमचे तज्ञ आपल्याला कॉल बॅक करतील. कॉसमॉस बँकेची निवड केल्याबद्दल धन्यवाद