<img height="1" width="1" style="display: none" src="https://www.facebook.com/tr?id=1773580009503867&amp;ev=PageView&amp;noscript=1">

इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं-6, सर्वे.नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

युपीआय सर्वव्यापी !!

आता बँकिंग सेवा आपल्यासाठी सोप्या केलेल्या आहेत! फक्त एका युपीआय अ‍ॅपसह एकापेक्षा अधिक खात्यांमध्ये आणि सर्व सेवांमध्ये प्रवेश करा. कॉसमॉस बँकेत फक्त बचत/चालू खात्यासाठी आपल्या युपीआय अ‍ॅपसह बँकिंग सुरू करा.

युनिफाइड पेमेंट इंटरफेस ही एक सिस्टीम आहे जी एकाच डिव्हाइस इंटरफेसद्वारे एकापेक्षा अधिक बँक खाते आणि सेवा वापरण्याची अनुमती देते. आपल्या बँकेच्या अकाऊंटमध्ये रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरद्वारे आपण आपले स्वतःचे युपीआय अ‍ॅप सेट करू शकता. युपीआयच्या वापरातून आपण आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना बेनिफिशिअरी म्हणून अ‍ॅड न करताही त्वरित पैसे पाठवू शकता! युपीआय व्हर्च्युअल प्रायव्हेट अ‍ॅड्रेस मिळवण्यासाठी या पात्रता आवश्यकता आहेतः

  • सक्रिय बचत किंवा चालू बँक खाते ''Self, Either or Survivor, Anyone' या तत्त्वावर वापरता येते.
  • बँक खात्यामध्ये नोंदणीकृत फोन नंबरसह ग्राहक आयडी.

आपण आपल्या खात्याच्या विविध वैशिष्ट्यपूर्ण सेवा वापरू शकता जसे की शिल्लक रकमेची चौकशी, मागील व्यवहारांचा तपशील आणि युपीआय अ‍ॅपद्वारे विनंती पाठवणे/संकलित करणे. तर, कशाची वाट पाहत आहात? लवकरात लवकर युपीआयसाठी नोंदणी करा!

खास वैशिष्ट्ये

  • 24X7 उपलब्धता - युपीआय आयएमपीएस प्लॅटफॉर्मवर आधारित आहे
  • एक अ‍ॅप अनेक खाती - आपल्या फोनवरील एका युपीआय अ‍ॅपशी आपण आपली अनेक बँक खाती लिंक करू शकता.
  • अतिरिक्त सुरक्षेसाठी - फक्त व्हीपीएची आवश्यकता आहे आणि त्यामधून कोणत्याही वापरकर्त्याची माहिती उघड होत नाही.

संपर्क

आपण दिलेल्या नंबरवर 24-48 तासांच्या आत आपल्याला मदत करण्यासाठी आमचे तज्ञ आपल्याला कॉल बॅक करतील. कॉसमॉस बँकेची निवड केल्याबद्दल धन्यवाद