<img height="1" width="1" style="display: none" src="https://www.facebook.com/tr?id=1773580009503867&amp;ev=PageView&amp;noscript=1">

इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं-6, सर्वे.नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

रक्कम लहान असो वा मोठी आमची सेवा आपल्या पाठी

एक स्थापित आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणाली (RBI च्या अधिकारांतर्गत असलेली) जी संपूर्ण भारतातील बँकिंग क्षेत्रामध्ये एक कार्यक्षम, सुरक्षित, किफायतशीर, विश्वासार्ह आणि जलद फंड ट्रान्सफर आणि क्लिअरिंगची सुविधा देते.

आपल्याला कोणत्याही बँकेच्या शाखेतून देशातील इतर कोणत्याही बँकेच्या शाखेत खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फंड ट्रान्सफर एनइएफटी मुळे करता येते. कागदावर केले जाणारे आत्ताचे फंड ट्रान्सफर आणि क्लिअरिंग प्रणालीवरील ताण कमी करणे हा यामागील उद्देश आहे.

फायदे: -


  • इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगद्वारे 24x7x365 सेवा उपलब्ध आणि शाखेला भेट देऊन शाखेच्या वेळेनुसार उपलब्ध.
  • लाभार्थीच्या खात्यात रिअल-टाइम च्या आसपासच्या वेळेत फंड ट्रान्सफर आणि सुरक्षित पद्धतीने सेटलमेंट
  • सर्व बँकांच्या मोठ्या नेटवर्कद्वारे संपूर्ण भारतभर व्याप्ती
  • लाभार्थीच्या खात्यात जमा झाल्यावर एसएमएस/ईमेलद्वारे पाठवणाऱ्याला सकारात्मक पुष्टी
  • बँक बचत खात्यातील ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही
  • क्रेडिट कार्डची देय रक्कम भरणा, कर्जाचा भरणा, परकीय चलनाची इनवर्ड रेमिटन्स इत्यादी विविध व्यवहारांसाठी वापरता येईल.

 

खास वैशिष्ट्ये

  • बँकेच्या एका शाखेतून बँकेच्या दुसऱ्या शाखेत फंड ट्रान्सफर करण्याचा सुरक्षित मार्ग.
  • व्यवहार मर्यादा - कोणतीही कमाल आणि किमान मर्यादा नाही.

एनइएफटी हस्तांतरण कसे करावे: -

  • आपल्या नेट बँकिंग खात्यात लॉग इन करा.
  • लाभार्थीला प्राप्तकर्ता म्हणून अ‍ॅड करा. असे करण्यासाठी, आपल्याला 'Add New Payee' विभागात लाभार्थ्याबद्दल खालील तपशील एंटर करावे लागतील:
    • खाते क्रमांक.
    • नाव
    • आयएफएससी कोड
    • खाते प्रकार
  • एकदा प्राप्तकर्ता अ‍ॅड केल्यानंतर फंड ट्रान्सफरची एक पद्धत म्हणून एनइएफटी निवडा.
  • आपण पैसे ट्रान्सफर करू इच्छित असलेले खाते निवडा, प्राप्तकर्ता, आपल्याला ट्रान्सफर करायची असलेली रक्कम एंटर करा आणि शेरे असल्यास नोंद करा (पर्यायी).
  • सबमिट वर क्लिक करा.

 

संपर्क

आपण दिलेल्या नंबरवर 24-48 तासांच्या आत आपल्याला मदत करण्यासाठी आमचे तज्ञ आपल्याला कॉल बॅक करतील. कॉसमॉस बँकेची निवड केल्याबद्दल धन्यवाद