इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं.-6, सर्वे नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

कॉस्मो गृह संजीवनी रिव्हर्स मॉर्टगेज कर्ज योजनेची आकर्षक वैशिष्ट्ये
मार्गदर्शित सेवा
आम्ही ग्राहकांना वेळोवेळी अद्ययावत माहिती देऊन प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करू.
उत्पन्नाची सुरक्षा
या योजनेच्या सहाय्याने निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा लाभ मिळवा.
सुलभ प्रक्रिया
आमच्याकडून संपूर्ण सहाय्य मिळवत सोप्या पद्धतीने कर्जासाठी अर्ज करा.

ज्येष्ठ नागरिकांसाठी आत्मनिर्भर होण्याकरता उपयुक्त कर्जयोजना.
आपल्या नियमित मासिक उत्पन्नाची गरज पूर्ण करते.

आत्तापर्यत आपण सारे काही घरासाठी केलेत आता घर तुमच्यासाठी निश्चित काहीतरी करू शकते. आपला त्रास कमी करण्यासाठी योग्य ठिकाणी संपर्क साधल्याबद्दल अभिनंदन!

आपण आयुष्यभर आपल्या घरासाठी कमावले आहे, आता आपल्या घराला आपल्यासाठी कमावू द्या. गृह संजीवनी योजना ही खास ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवण्यात आली आहे जेणेकरून त्यांना त्यांचे घर तारण ठेवून बँकेकडून मासिक रकमेचा लाभ घेता येईल. हे निवृत्त झालेल्यांना तारण रक्कम भरण्यापासून मुक्त ठेवते. ज्या ज्येष्ठ नागरिकांना स्वावलंबी बनायचे असेल आणि त्यांना नियमित उत्पन्नाची आवश्यकता असल्यास ते या योजनेमार्फत मिळालेल्या पैशांच्या आधारावर स्वत:चा खर्च भागवू शकतील.

याव्यतिरिक्त ज्या व्यक्तींची मालमत्ता तरल मालमत्ता स्वरूपातील आहे त्यांच्यासाठी रिव्हर्स मॉर्टगेज योजना देखील एक आदर्श पर्याय आहे.

आमच्या अनुभवी कर्मचार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेचा लाभ घ्या.

गृह संजीवनी योजना ही ज्येष्ठ नागरिक असलेल्या घरमालकांना महिन्याला हप्ता न भरता गृहकर्ज मिळवण्याची सुविधा करून देते. या योजनेमार्फत आपल्या घराच्या तारणावर दर महिन्याला बँकेकडून नियमित ठराविक रक्कम मिळवता येते. ज्येष्ठ नागरिकांना नियमित उत्पन्नाची आवश्यकता असल्यास त्यांना या योजनेचा भरपूर फायदा घेता येईल ते या योजनेमार्फत मिळालेल्या पैशांच्या आधारावर स्वत:चा खर्च भागवू शकतील. त्याचबरोबर, कोणत्याही कारणामुळे ज्या व्यक्तीची मालमत्ता सहज रोखता मिळवता येण्याच्या स्थितीमध्ये असेल अशांसाठी रिव्हर्स मॉर्टगेज योजना देखील एक उत्तम पर्याय राहतो. आम्हाला आपल्या गरजा कळतात आणि कर्जाशी संबंधित सेवांसाठी जलद आणि मार्गदर्शित सेवेमध्ये आपले स्वागत करतो.

कर्जाशी संबंधित ठळक मुद्दे
  • कर्जाची मर्यादा
    रु. 70 लाखांपर्यंत
  • व्याजदर
    11%* प्रति वर्ष (फ्लोटिंग)
  • कर्ज वितरण कालावधी
    30 दिवस
  • परतफेडीचा कालावधी
    60 ते 70 वयोगटासाठी कर्जाचा कमाल कालावधी 15 वर्षे,
    >70 वर्षे आणि जास्तीत जास्त 75 वयापर्यंत कमाल कालावधी 10 वर्षे
  • प्रीपेमेंट शुल्क
    शून्य
प्रक्रिया शुल्क
  • 0.50% कर्जाच्या रकमेपैकी किमान
    रु. 500/- आणि कमाल
    रु. 10,000/-
खाते मुदत पूर्व बंद करण्यासाठीचे शुल्क
  • जर कर्जदाराने त्याचे कर्ज पडताळणी
    करता येण्यासारख्या योग्य स्रोतामधून समयोजित
    केल्यास कोणताही प्री-पेमेंट दंड लागू
    होत नाही.
  • 1%
    शेवटच्या महिन्याच्या अखेरीस असणारी थकीत
    रक्कम.
पात्रता
  • अर्जदार व्यक्ती 60 वर्षांवरील भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
    आर्थिक सहाय्यासाठी जोडीदार सह-कर्जदार म्हणून पात्र असेल
सुविधा

*अधिक तपशिलांसाठी कृपया बँकेशी संपर्क साधा.

आवश्यक दस्तऐवज
  • केवायसी दस्तऐवज
  • उत्पन्नाची/आर्थिक कागदपत्रे
  • मालमत्ता/तारण दस्तऐवज
  • मंजूर केलेल्या प्लॅनची प्रत आणि बिल्डरचे नोंदणीकृत डेव्हलपमेंट अ‍ॅग्रीमेंट, कन्व्हेयंस डीड.
  • मागील 3 वर्षांसाठीचा आयकर परतावा.
  • मागील 6 महिन्यांचे बँकेचे विवरण (स्टेटमेंट)
  • मागील 2 वर्षांचा फॉर्म 16.
  • मागील 3 वर्षांची बॅलंस शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट [स्वयंरोजगार व्यावसायिकांसाठी]

संपर्क

आमचे तज्ज्ञ तुम्हाला पुढील सहाय्यासाठी 24-48 तासांच्या आत तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करतील. कॉसमॉस बँकेत स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद.

ग्राहकांसाठी महत्वाचे
  • मासिक / त्रैमासिक / अर्धवार्षिक हप्त्यांच्या स्वरूपात किंवा आवश्यक असल्यास एकरकमी पेमेंटच्या स्वरूपात नियमित उत्पन्नाचा स्रोत ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रदान करणे.
माहीत असावे असे
  • फॉर्म - ऑनलाइन फॉर्म सेंटरवर उपलब्ध

*अटी आणि शर्ती लागू