<img height="1" width="1" style="display: none" src="https://www.facebook.com/tr?id=1773580009503867&amp;ev=PageView&amp;noscript=1">

इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं-6, सर्वे.नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

आपल्या अद्वितीय ओळखीचा हुशार पद्धतीने वापर

आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम (एइपीएस) ही आपल्या युनिक आयडेंटिफिकेशन नंबरवर आधारित पेमेंटची सेवा आहे. ती आपल्याला आधार कार्डवर आधारित ऑथेंटिकेशनद्वारे अखंडपणे आर्थिक व्यवहार करण्यासाठी आपल्या आधार कार्डचा वापर करून आधार लिंक केलेले बँक खाते वापरण्यासाठी सक्षम करते. शिल्लक रकमेची चौकशी, रोख ठेव, रोख पैसे काढणे आणि बिझनेस व्यवहारांद्वारे पैसे पाठवणे यासारखे मूलभूत बँकिंग व्यवहार करण्यात आपल्याला मदत करते.

ही बँकेची सेवा आहे जे आधार ऑथेंटिकेशन वापरून कोणत्याही बँकिंग करेस्पोंडेंट(बीसी) द्वारे पीओएस (पॉइंट ऑफ सेल/मायक्रो एटीएम) वर ऑनलाइन अंतर्व्यवहार्य आर्थिक व्यवहारांना अनुमती देते. आर्थिक व्यवहारांसाठी हे एक साधे, सुरक्षित आणि वापरकर्त्यांसाठी -अनुकूल असे व्यासपीठ आहे.

एइपीएस वापरासाठी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असणे आवश्यक आहे.

फायदे: -


  • विविध बँकांमध्ये अंतरव्यवहार्य
  • आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देते आणि पारांपारिकरीत्या बँक सेवेचा उपभोग घेत नसलेल्या समाजातील वर्गांना सेवा देते
  • सर्व बँक खातेधारक आधार ऑथेंटिकेशनावरून त्यांचे बँक खाते एइपीएसच्या माध्यमातून वापरू शकतील
  • फक्त आधार क्रमांक आणि बायोमेट्रिकच्या आवश्यक माहितीवरून एइपीएस-वरून व्यवहार करू शकता.
  • आधार ऑथेंटिकेशनाचा वापर करून केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही शासकीय योजनांची जसे की नरेगा, सामाजिक सुरक्षा निवृत्तीवेतन, दिव्यांग ज्येष्ठ व्यक्तींचे निवृत्तीवेतन इत्यादींच्या संवितरणाची सुविधा एईपीएस द्वारे दिली जाते.

खास वैशिष्ट्ये

  • रोख भरणा करणे, रोख रक्कम काढणे, इंट्रा-बँक किंवा इंटर-बँक फंड ट्रान्सफर, बॅलन्सची चौकशी आणि बँकिंग करेस्पोंडेंट मार्फत मिनि स्टेटमेंट प्राप्त करणे यासारखे मूलभूत बँकिंग व्यवहार आधार लिंक असलेल्या बँक खात्यामधून करण्यासाठी बँक ग्राहकांनी त्यांचे आधार कार्ड ओळख म्हणून वापरावे याकरिता त्यांचे सक्षमीकरण करणे
  • यूआयडीएआय द्वारे समर्थित आधार आणि त्याचे ऑथेंटिकेशन यांचा वापर करून केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही शासकीय हक्कांचा जसे की नरेगा, सामाजिक सुरक्षा निवृत्तीवेतन, दिव्यांग ज्येष्ठ व्यक्तींचे निवृत्तीवेतन इत्यादींच्या संवितरणामध्ये मदत करणे.

तपशील

तपशील/माहीत असावे असे: -

संपर्क

आपण दिलेल्या नंबरवर 24-48 तासांच्या आत आपल्याला मदत करण्यासाठी आमचे तज्ञ आपल्याला कॉल बॅक करतील. कॉसमॉस बँकेची निवड केल्याबद्दल धन्यवाद