<img height="1" width="1" style="display: none" src="https://www.facebook.com/tr?id=1773580009503867&amp;ev=PageView&amp;noscript=1">

इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं-6, सर्वे.नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

परकीय चलनातील व्यवहार आता आपल्यासाठी सोपे झाले आहेत!

परकीय चलन व्यवहारांशी निगडित काही करायचे आहे का? मग कॉसमॉसचा परकीय चलन विभाग आपल्यासाठी योग्य ठिकाण आहे. जगभरातील 110 पेक्षा जास्त बँकांशी करेस्पोंडेंट संबंध असलेली कॉसमॉस बँक ही परकीय चलनाच्या नोटांची विक्री/खरेदी असो किंवा प्रवासी चेक, सर्व प्रकारचे पैसे पाठवणे, आयात आणि निर्यात सेवा आणि यांसारख्या बऱ्याच फॉरेक्स सेवा आपल्याला सर्वोत्कृष्ट पद्धतीने देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

आमच्या सेवा

कॉसमॉस बँक ही परकीय चलनातील अधिकृत डीलर आहे आणि ती सर्व प्रकारच्या परकीय चलन सेवा पुरविते. आमच्याकडे महाराष्ट्र, गुजरात आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यांमध्ये सात बी श्रेणीचे फॉरेक्स सेल आहेत आणि मुंबई येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज संपूर्णपणे कार्यशील एकात्मिक कोषागार (इंटीग्रेटेड ट्रेझरी सेल) आहे. आमची नॉस्त्रो खाती, वेल्‍स् फार्गो बॅंक, कॉमर्झ बॅंक आणि बँक ऑफ इंडियामध्ये आहेत. त्याशिवाय, आम्ही जगभरातील 110 पेक्षा जास्त बँकांशी करेस्पोंडेंट संबंध प्रस्थापित केले आहेत. आम्ही खालील सेवा उपलब्ध करतो.

  • परकीय चलनाच्या नोटांची विक्री व खरेदी आणि प्रवासी चेक
  • उच्च शिक्षणासाठी पाठवलेले पैसे, परदेशात वैद्यकीय उपचार, व्यवसाय सहली, पर्यटन, रोजगार, इमिग्रेशन, भेटवस्तू, देणग्या आणि उदारीकृत रेमिटन्स योजनेंतर्गत रेमिटन्स इत्यादी सर्व प्रकारचे क्लीन आउटवर्ड रेमिटन्स.
  • आयात उद्देशांसाठी आउटवर्ड रेमिटन्स, आयात दस्तऐवज हाताळणे, परदेशी पत पत्राची स्थापना, परदेशी बँक हमी जारी करणे, खरेदीदाराचे क्रेडिट इत्यादींसारखी आयात सेवा.
  • कुटुंबाच्या देखभालीसाठी रेमिटन्स, भेटवस्तू, देणगी इत्यादींसारखे सर्व प्रकारचे क्लीन इनवर्ड रेमिटन्स.
  • निर्यातीसाठी आगाऊ म्हणून प्राप्त झालेल्या इनवर्ड रेमिटन्स हाताळणे, निर्यात दस्तऐवज हाताळणे, रु./परकीय चलनामध्ये शिपमेंटपूर्व आणि शिपमेंट नंतर निर्यात क्रेडिट सुविधा यांसारख्या निर्यात सेवा

सर्व शाखांवरून ग्राहकांसाठी यूएसडी नामांकित चेक/डिमांड ड्राफ्ट्स संकलन सेवा

सेवेचे नियम

  • आमची बँक यूएसडी नामांकित चेकसाठी जलद संकलन व्यवस्था आणि फायनल क्रेडिट योजना (एफसीएस) ही सुविधा पुरवते. योजनेचे ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
    • चेक रक्कम यूएसडी 1000.00 आणि त्यापेक्षा जास्त असावी
    • न्यू यॉर्क, न्यू जर्सी आणि Wells Fargo Bank ची शाखा असलेल्या ठिकाणी देय असलेल्या चेक/ड्राफ्ट चे क्रेडिट 6 कामकाजाच्या दिवसांमध्ये.
    • यूएसए मधील इतर सर्व शहरांमध्ये देय असलेले चेक/ड्राफ्ट चे क्रेडिट 14 कामकाजाच्या दिवसांमध्ये
    • यूएसडी चेक्स क्लिअरन्ससाठी साधारण वेळ 21 कामकाजाचे दिवस आहे
    • या सुविधेचा लाभ घेतांना आवश्यक असणारे कुरीयरचे शुल्क भरावे लागेल

खास वैशिष्ट्ये

  • स्विफ्ट रेमिटन्स - नवीनतम वैशिष्ट्याचा लाभ
  • आम्ही सर्वत्र - जगभरातील 110 बँकांसह कनेक्शन

तपशील

आमच्या नवीन सेवेबद्दल

परदेशी बँका किंवा राष्ट्रीयकृत बँकांच्या परदेशी शाखांमध्‍ये असलेल्या आमच्या परकीय चलन खात्यांची यादी:

चलन बँकेचे नाव बँक कोड खाते क्रमांक
ग्रेट ब्रिटन पाउंड कॉमर्स बँक एजी, फ्रँकफर्ट COBADEFFXXX 400875132300
अमेरिकन डॉलर वेल्स फार्गो बँक, न्यू यॉर्क PNBPUS3NNYC 2000193005130
अमेरिकन डॉलर माश्रेक बँक पीएससी न्यूयॉर्क  MASHQUS33XXX 70011239
युरो कॉमर्स बँक एजी, फ्रँकफर्ट COBADEFFXXX 400875132300
जपानी येन बँक ऑफ इंडिया, टोकियो BKIDJPJTXXX 2335000053

संपर्क

आपण दिलेल्या नंबरवर 24-48 तासांच्या आत आपल्याला मदत करण्यासाठी आमचे तज्ञ आपल्याला कॉल बॅक करतील. कॉसमॉस बँकेची निवड केल्याबद्दल धन्यवाद