<img height="1" width="1" style="display: none" src="https://www.facebook.com/tr?id=1773580009503867&amp;ev=PageView&amp;noscript=1">

इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं-6, सर्वे.नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

बिले भरणे हे आता जिकिरीचे काम राहिलेले नाही!

बिलं भरणे ही प्रत्येकासाठी प्रत्येक महिन्यात करायची गोष्ट आहे. कॉसमॉस बँकेचे ई-बिल पे हे एक सर्वसमावेशक बिल पेमेंट्स करण्याचा पर्याय आहे जो आपल्याला आपले टेलिफोन, वीज आणि मोबाईल फोनचे बिल इंटरनेटद्वारे भरण्याची सुविधा देतो. ही बिलं आपण एक महिन्याच्या किंवा तीन महिन्याच्या अंतराने आपण निवडलेल्या बँक खात्याद्वारे भरली जातात. कोणताही फॉर्म न भरता किंवा बँकेला भेट न देता आपण या सुविधेचा लाभ घेऊ शकता. ऑनलाइन नोंदणी करा आणि ऑनलाइन पेमेंट्स देण्यासाठीच्या नोटीस सेट करा.

युनिवर्सल बिल पेमेंट्स कशासाठी?


गेल्या काही वर्षांमध्ये सर्व काही ऑनलाइन झाल्यामुळे आता लोक घरबसल्या किंवा ऑफिसमधून जास्तीतजास्त कामे पूर्ण करण्याला प्राधान्य देऊ लागले आहेत. खरेदी, तिकिटे बुक करणे, बिले भरणे अशा आणि इतर कामांसाठी लोकांनी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे.

ऑनलाइन बिल पेमेंट्स केल्यामुळे पारंपारिक पद्धतीने पेमेंट्स केल्याचे अनेक तोटे दूर होतात. उदाहरणार्थ, ऑनलाइन बिले भरताना पेमेंट्सच्या वेळेबद्दल काळजी करण्याची गरज नाही कारण ते वापरकर्त्याच्या सोयीने कोणत्याही वेळी करता येते.

याव्यतिरिक्त या सेवेच्या वापरामुळे एकाच वेबसाइटवरून अनेक बिले भरता येतात, ज्यामुळे प्रत्येक बिलासाठी त्या त्या कार्यालय/पेमेंट्स डेस्कवर जाऊन आणि लांब रांगेत उभे राहण्याचा वेळ आणि मेहनत वाचते.

पेमेंट केल्याच्या पावत्या कॉम्प्युटरवर जतन करता येतात, ज्यामुळे एखाद्याला कागदपत्रांच्या जबाबदारीतून मुक्त राहता येते. यामुळे लक्ष ठेवणे आणि पटकन पावती मिळवणे देखील सोपे होते.

पेमेंट यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाला त्याची पोचपावती मिळते, ज्यामुळे कोणताही व्यत्यय किंवा गैरप्रकारांच्या बाबतीत व्यक्तीला अद्ययावत राहण्यास मदत करते जे पारंपारिक पेमेंट पद्धतींमध्ये कठीण असते.

खास वैशिष्ट्ये

  • सहजता- बिल पेमेंट्स करणे हे कधीही सोपे नव्हते.
  • कोणतेही शुल्क नाही – आमच्यामार्फत आपली बिले विनामूल्य भरा.
  • विविधता- आमच्या वेबसाइटद्वारे अनेक प्रकारची बिले भरा

तपशील

माहीत असावे असे

संपर्क

आपण दिलेल्या नंबरवर 24-48 तासांच्या आत आपल्याला मदत करण्यासाठी आमचे तज्ञ आपल्याला कॉल बॅक करतील. कॉसमॉस बँकेची निवड केल्याबद्दल धन्यवाद