इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं.-6, सर्वे नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

कॉसमॉस प्रॉपर्टी मॉर्टगेज कर्ज योजनेची आकर्षक वैशिष्ट्ये
जामीनदार
दोन ऐवजी एक जामिनदार स्वीकारला जाऊ शकतो
परतफेडीचा कालावधी
मुदत कर्जासाठी कमाल कालावधी 12 वर्षे आणि ओव्हरड्राफ्टसाठी 15 महिन्यांच्या आत पुनरावलोकन

आपली मौल्यवान वास्तू आपल्याला देईल आर्थिक आधार !

तुमचा भार हलका करण्यासाठी तुमची मालमत्ता कार्यरत ठेवा. उच्च शिक्षण, विनातारण कर्जांची परतफेड किंवा तुम्हाला व्यवसायाच्या दृष्टीने परदेशात जायचे असल्यास किंवा एखादा निवासी प्लॉट खरेदी करायचे ध्येय असल्यास कॉसमॉस प्रॉपर्टी तारण कर्ज हे तुमचा आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टीने बनवलेले आहे. मोठ्या योजनांसह येतात मोठ्या जबाबदार्‍या आणि त्या जबाबदाऱ्या तुमच्या मालमत्तेच्या साहाय्याने सोप्या केल्या जाऊ शकतील.

कर्जाशी संबंधित ठळक मुद्दे
  • कर्जाची मर्यादा
    मर्यादा नाही
  • व्याजदर
    जास्तीत जास्त रु.5.00 कोटी कर्जासाठी
    प्राधान्यकृत क्षेत्र: -@9.75%प्रति वर्ष
    बिगर-प्राधान्य क्षेत्र:-प्रति वर्ष 10.00%
    [टर्म लोन आणि ओडी मंजूर करण्याची मर्यादा 50%:50% फॉर्म ]
    रु.5.00 कोटींपेक्षा जास्त कर्जासाठी
    व्यावसायिक क्रेडिट रेटिंगनुसार व्याजदर
    ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी
    पहिल्या वर्षासाठी 10.25%, पहिल्या वर्षानंतर कमर्शियल क्रेडिट रेटिंगनुसार.
  • कर्ज वितरण कालावधी
    30 ते 35 दिवस
  • परतफेडीचा कालावधी
    मुदत कर्जासाठी कमाल कालावधी 12 वर्षे आणि ओव्हरड्राफ्टसाठी 15 महिन्यांच्या आत पुनरावलोकन
  • प्रीपेमेंट शुल्क
    शून्य
प्रक्रिया शुल्क 05.06.2025 पासून
नवीन प्रस्तावांसाठी -
  • (रु. 1.00 कोटीपर्यंत) -0.25% + GST
  • (रु. 1.00 कोटीपासून रु. 5.00 कोटींपर्यंत ) -0.20% + GST
    रीव्ह्यु -0.20% + GST
  • (रु.5.00 कोटींवरील)
    प्राधान्य क्षेत्र - 0.50% + GST
    बिगर-प्राधान्य क्षेत्र - 0.75% + GST
रीव्ह्यु -0.20% + GST
खाते मुदत पूर्व बंद करण्यासाठीचे शुल्क
  • व्यक्ती – शून्य
  • व्यावसयिक –
  • 1.- 12 महिन्यांमध्ये- 3%,
  • 2. 12 महिन्यांनंतर पण 24 महिन्यांपूर्वी- 2%
  • 3. 24 महिन्यांनंतर- 1%
पात्रता
  • प्लॉट्सच्या बाबतीत गुणवत्तेच्या प्रकरणांमध्ये बांधलेली इमारत स्वीकारली जाऊ शकेल जर ती मालमत्ता कायदेशीररीत्या बिगर-शेती म्हणून जाहीर झाली असेल आणि बॅंकेच्या तारणाचा बोर्ड लावून संपूर्णपणे कुंपण टाकलेल्या स्वरूपात असायला हवी.
  • तारण ठेवण्याकरीता व्यावसायिक मालमत्तेचे कमाल अनुमत वय 30 वर्ष आहे, तर निवासी मालमत्तेकरीता ते 25 वर्ष आहे. या मर्यादेबाहेरील जुन्या मालमत्ता स्वीकारू शकत नाही. मूल्यांकन अहवालाद्वारे आणि बँकेने दिलेल्या भेटीद्वारे बांधकाम आरसीसीचे आणि मालमत्तेचे अवशिष्ट आयुष्य कर्जाच्या कालावधीपेक्षा जास्त आहे याची पुष्टी केली जाईल.
  • मालमत्ता ही बांधलेल्या स्थितीत रहिवासी किंवा व्यावसायिक उद्देशासाठी अधिकृत असलेले पूर्तता प्रमाणपत्र (कंप्लिशन सर्टिफिकेट) प्राप्त झालेली असावी.
  • कायदेशीर आवश्यकतेनुसार सर्व मूळ टायटल डीड्स उपलब्ध असतील तरच नोंदणीकृत तारण पद्धतीने प्रॉपर्टी मॉर्टगेज ठेवता येते.
  • व्याजाच्या ईएमआयसाठी पीडीसी (पोस्ट डेटेड चेक) जमा करणे बंधनकारक आहे
  • प्राधान्यकृत क्षेत्रांसाठी उद्योग आधार बंधनकारक.
सुविधा
  • टर्म लोन किंवा ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध
आवश्यक दस्तऐवज
  • केवायसी दस्तऐवज
  • उत्पन्नाची/आर्थिक कागदपत्रे
  • नवीनतम बँक स्टेटमेंट/पासबुक जिथे आपण मागील 6 महिन्यांसाठी जमा झालेला पगार/उत्पन्न दाखवू शकता.
  • मागील 2 वर्षांचा फॉर्म 16.
  • 2 वर्षांचा आयकर परतावा, सीएच्या सील आणि सहीसह, उत्पन्नाचा लेखाजोखा, पी अँड एल, बॅलन्स शीट[ स्वयंरोजगार]
  • संबंधित मालमत्तेच्या / तारण कागदपत्रांच्या मूळ प्रती कर्जासाठी तारण ठेवण्यात येतील.

संपर्क

आमचे तज्ज्ञ तुम्हाला पुढील सहाय्यासाठी 24-48 तासांच्या आत तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करतील. कॉसमॉस बँकेत स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद.

ग्राहकांसाठी महत्वाचे
  • उच्च शिक्षण
  • विनातारण कर्जांची परतफेड
  • परदेशी व्यवसायिक भेटीवरील खर्च
  • निवासी प्लॉटची खरेदी
  • प्लॉटवरील बांधकाम जेथे काही टायटल डीड्स/संलग्न दस्तऐवज उपलब्ध नाहीत
  • व्यवसाय प्रमोशन
माहीत असावे असे
  • बँकेला मान्य असलेल्या दोन जामीनदारांची नावे द्यावी लागतील. मात्र प्रस्तावाची योग्यता लक्षात घेतल्यानंतर एक जामीनदार स्वीकारला जाईल
  • परतफेड क्षमता: कर्जदार/सह-कर्जदाराच्या उत्पन्नाचा डीएससीआर (डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो) किंवा परतफेड क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी विचार केला जाऊ शकतो.

    चालू असलेल्या इतर कर्जाच्या परतफेडीचा भार देखील विचारात घ्यावा लागेल
  • निधीचा अंतिम वापर: कर्जाच्या रकमेचा वापर केवळ अर्ज केलेल्या उद्देशासाठी केला जाईल याची पुष्टी करण्यासाठी याबाबत दिलेल्या हमीपत्राव्यतिरिक्त , वितरीत केलेल्या निधीचा अंतिम वापर दर्शविणारे दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे
  • फॉर्म्स: ऑनलाइन फॉर्म सेंटरवर उपलब्ध

*अटी आणि शर्ती लागू