इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं.-6, सर्वे नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

कॉस्मो शैक्षणिक कर्ज योजनेची आकर्षक वैशिष्ट्ये
विस्तृत श्रेणीमध्ये उपलब्ध
कॉस्मो शैक्षणिक कर्ज योजना ही पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विस्तृत श्रेणीसाठी उपलब्ध आहे.
दीर्घ कालावधी
कमाल कालावधी 10 वर्षे असेल (मोरॅटोरियम कालावधीसहित)
जलद प्रक्रिया
कर्ज मिळविण्यासाठी सोपी आणि त्वरित प्रक्रिया.

आपल्या स्वप्नांना पंख द्या.

पात्र गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि यशस्वी करिअर घडवण्यासाठी आवश्यक असलेले आर्थिक सहाय्य देण्याकरिता कॉस्मो शैक्षणिक कर्ज योजना तयार केली आहे. भारताची युवा पिढी देशासाठी सर्वात अमूल्य ठेवा असून युवकांनी शिक्षण घेत असताना कमाईच्या बंधनापासून किंवा तणावापासून मुक्त होऊन जीवनात आपले ध्येय साध्य करावे अशी आमची मनापासून इच्छा आहे.

कर्जाशी संबंधित ठळक मुद्दे
  • कर्जाची मर्यादा
    भारतातील शैक्षणिक कर्ज - रु. 1.00 कोटीपर्यंत
    परदेशात शैक्षणिक कर्ज - रु. 1.5 कोटींपर्यंत
  • व्याजदर
    भारतात आणि परदेशात विद्यार्थिनींसाठी 8.50%* प्रति वर्ष
    विद्यार्थ्यांसाठी 8.90%* प्रति वर्ष

  • कर्ज वितरण कालावधी
    30 दिवस
  • परतफेडीचा कालावधी
    10 वर्ष
  • प्रीपेमेंट शुल्क
    शून्य
कर्ज शुल्क
  • भारतातील शिक्षणासाठी प्रक्रिया शुल्क रु. 5,000/- + GST.
    कर्ज मागणीसाठी 0.50% + GST परदेशासाठी
खाते मुदत पूर्व बंद करण्यासाठीचे शुल्क
  • शून्य
पात्रता
  • अर्जदार हा बँकेचा साधारण किंवा नाममात्र सदस्य असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार/पालकांचे आमच्या बँकेसोबत बँकिंग असणे आवश्यक.
  • विद्यार्थी हा भारतीय रहिवासी असावा.
  • विद्यार्थ्याने भारतामध्ये किंवा बाहेरगावी प्रवेश परीक्षेमार्फत/ मेरिट नुसार होणार्‍या निवड प्रक्रियेमार्फत प्रोफेशनल/टेक्निकल अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवला असला पाहिजे.
  • शैक्षणिक संस्था/प्रतिष्ठीत आणि मान्यताप्राप्त संस्थांच्या माध्यमातून प्रस्तावित कोर्सेस कर्जाच्या मर्यादेसाठी पात्र असतील.
सुविधा

*अधिक तपशिलांसाठी कृपया बँकेशी संपर्क साधा.

आवश्यक दस्तऐवज
  • सर्व कागदपत्रे केवायसी नियमांनुसार म्हणजेच, विद्यार्थी कर्जधारक आणि त्याचे पालक / देखभालकर्त्यांचे (गार्डियन) पत्त्याचा पुरावा आणि ओळखपत्र.
  • शेवटच्या पात्रता परीक्षेची गुणपत्रिका.
  • कॉलेजमधील प्रवेश, शिष्यवृत्ती, सहाय्यकपदाचा पुरावा
  • निर्दिष्ट कोर्ससाठी खर्चाचे वेळापत्रक.
  • विद्यार्थी कर्जदार आणि किंवा त्यांचे पालक / देखभालकर्ते / जोडीदार यांच्या सॅलरी स्लिप्स.
  • कर्जदाराच्या शेवटच्या सहा महिन्यांचे खात्याचे स्टेटमेंट.
  • सह-कर्जदाराच्या (को-बॉरोवर) मालमत्ता आणि दायित्वे यांचे स्टेटमेंट.
  • उत्पनाचा पुरावा – सॅलरी स्लिप / फॉर्म 16.
  • परदेशात शिक्षणाच्या बाबतीत पासपोर्ट आणि व्हिसा कागदपत्रे.
  • अभ्यासक्रम बदलणे/अभ्यासक्रम पूर्ण करणे/अभ्यास संपवणे/कोणत्याही शुल्काचा परतावा महाविद्यालय/संस्था/यशस्वी नियुक्ती/नोकरी सोडणे/नोकरी बदलणे इत्यादी बाबतीत विद्यार्थी कर्जदाराने बँकेला कळवणे आवश्यक आहे.

संपर्क

आमचे तज्ज्ञ तुम्हाला पुढील सहाय्यासाठी 24-48 तासांच्या आत तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करतील. कॉसमॉस बँकेत स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद.

ग्राहकांसाठी महत्वाचे
  • जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात
  • ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी जायचे आहे
माहीत असावे असे
  • विविध अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक कर्ज योजना उपलब्ध. भारतामधील अभ्यासक्रमांची यादी खाली दिली आहे.
  • पदवी अभ्यासक्रम : बीए, बी कॉम, बीएससी इ.
  • पदव्युत्तर अभ्यासक्रम: मास्टर्स आणि पीएचडी
  • व्यावसायिक अभ्यासक्रम: अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुवैद्यकीय, लास, दंतवैद्यकीय, व्यवस्थापन, संगणक इ.
  • इलेक्ट्रॉनिक्स विभाग किंवा संलग्न संस्थांना मान्यताप्राप्त नामांकित संस्थांचे संगणक प्रमाणपत्र अभ्यासक्रम
  • आयसीडब्ल्यूए, सीए, सीएफए, इत्यादी अभ्यासक्रम.
  • आयआयएम, आयआयटी, आयआयएससी, एक्सएलआरआय, एनआयएफटी इ. कडून घेण्यात येणारे अभ्यासक्रम .
  • एरोनॉटिकल, पायलट प्रशिक्षण, शिपिंग इ. सारख्या पदवी/पदविकांचे नियमित अभ्यासक्रम, जर अभ्यासक्रम भारतामध्ये घेतला जात असेल तर त्याला डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन/शिपिंगकडून मंजूरी. अभ्यासक्रम बाहेरगावी घेतला जात असल्यास त्या शिक्षणसंस्थेला स्थानिक एव्हिएशन/शिपिंग प्राधिकरणाची मान्यता असायला हवी
  • नामांकित परदेशी विद्यापीठांनी भारतात प्रस्तावित केलेले अभ्यासक्रम
  • मान्यताप्राप्त संस्थांचे सायंकालीन अभ्यासक्रम
  • यूजीसी/सरकार/एआयसीटीई/एआयबीएमएस/आयसीएमआर इत्यादींद्वारे मान्यताप्राप्त महाविद्यालये/विद्यापीठांनी आयोजित केलेले डिप्लोमा/पदवी इत्यादी अभ्यासक्रम.
  • राष्ट्रीय संस्था आणि इतर नामांकित खाजगी संस्थांनी प्रस्तावित केलेले अभ्यासक्रम. भविष्यातील संभाव्यता/वापरकर्ता संस्थांनी दिलेल्या मान्यतेनुसार इतर संस्थांच्या अभ्यासक्रमांचे मूल्यांकन करण्याची बँकांकडे प्रणाली असू शकते.
  • उपरोक्त नमूद केलेल्या निकषांतर्गत जे अभ्यासक्रम (कोर्सेस) समाविष्ट नाहीत अशांसाठी बँका स्वतंत्रपणे भविष्यातील संभाव्यता/वापरकर्ता संस्थेची मान्यता लक्षात घेऊन योजनेअंतर्गत शैक्षणिक कर्जाचा विस्तार करण्याचा विचार करू शकतात.
  • परदेशात शिक्षण:
  • पदवी: नामांकित युनिव्हर्सिटींकडून नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने असलेले व्यावसायिक/तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी
  • पदव्युत्तर शिक्षण: सीआयएमए-लंडन, युएसएमधील सीपीए यांजकडून घेण्यात येणारे एमसीए, एमबीए, एमएस, इ.अभ्यासक्रम इ.
  • विचारात घेतलेले खर्च:
  • रु. 2 लाखांपर्यंत कर्ज:
    पालकांचे सहकर्जदायित्व आवश्यक आहे.
  • रु. 2 लाखांपेक्षा अधिक: पालकांच्या सह-बाध्यतेसह योग्य त्या तारणासोबत हप्त्याचा भरणा करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यातील कमाईचे असाइनमेंट. 100 % चे सिक्युरिटी कव्हर देणे अपेक्षित आहे.
  • कालावधी: कमाल कालावधी 10 वर्षे असेल (मोरॅटोरियम कालावधी सहित)
  • पालकांव्यतिरिक्त दोन स्वीकारार्ह जामीनदार घेणे आवश्यक
  • तारण
  • रु. 2 लाखांपर्यंत कर्ज:
    पालकांचे सहकर्जदायित्व आवश्यक आहे.
  • रु. 2 लाखांपेक्षा अधिक: पालकांच्या सह-बाध्यतेसह योग्य त्या तारणासोबत हप्त्याचा भरणा करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यातील कमाईचे असाइनमेंट. 60 % ते 70% पर्यंतचे सिक्युरिटी कव्हर देणे अपेक्षित आहे.
  • सुट्टी/विलंबावधि प्रसंगी परतफेड:
  • अभ्यासक्रम कालावधी + 1 वर्षे, किंवा नोकरी मिळाल्यापासून 6 महिने, जे काही आधी असेल त्याप्रमाणे. रीपेमेंट हॉलिडे / मोरॅटोरियम कालावधीमध्ये साधारण व्याज आकारले जाईल रीपेमेंट हॉलिडे कालावधीमध्ये जमा झालेले व्याज हे मुद्दलीमध्ये जोडण्यात येईल आणि परतफेड ही समविभाजित मासिक हफ्त्यांमध्ये (ईएमआय) घेतली जाईल.
  • मोरॅटोरियम कालावधी दरम्यान व्याज भरण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे
  • जामीनदार : पालकांव्यतिरिक्त दोन स्वीकारार्ह जामीनदार घेणे आवश्यक
  • फॉर्म्स: ऑनलाइन फॉर्म केंद्रावर उपलब्ध.

*अटी आणि शर्ती लागू