सुरक्षिततेच्या उपाययोजना
कॉसमॉस बँक कधीही गोपनीय माहिती विचारणारे ईमेल्स पाठवत नाही. आपला पिन, पासवर्ड, खाते क्रमांक यासारख्या आपल्या इंटरनेट बँकिंग तपशीलांची विनंती करणारा ईमेल आपल्याला मिळाल्यास, आपण प्रतिसाद देऊ नये.
संशयास्पद ईमेल्स न उघडता डिलीट करा. आपण ते उघडत असल्यास, त्यामध्ये असलेल्या कोणत्याही लिंकवर किंवा संलग्नकांवर क्लिक करू नका.
आपला कॉम्प्युटर सुरक्षित करण्यासाठी, आमच्या "कॉम्प्युटर सुरक्षा टिपा" वाचा.
ईमेल संबंधित फसवणूक आणि फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी टिपा जाणून घेण्यासाठी, सुरक्षितता आणि सुरक्षा/ओव्हरव्यू विभागातील "फिशिंग" आणि "मनी म्यूल" वाचा.
इंटरनेट ब्राउझिंग सुरक्षितता टिपा
आपण कुठे क्लिक करता त्याकडे लक्ष द्या:
वेगवेगळ्या वेबसाइट्स ब्राउझ करताना आपण क्लिक संबंधी शिस्त पाळली पाहिजे. आपल्या कॉम्प्युटरावर दुर्भावनापूर्ण कोड/सॉफ्टवेअर किंवा व्हायरस डाउनलोड करू शकणार्या दुर्भावनायुक्त लिंकवर आपण चुकून क्लिक करू शकता.
विश्वासार्ह नसलेल्या साइटवरून सॉफ्टवेअर डाउनलोड करू नका:
विश्वासार्ह नसलेल्या साइटवरून सॉफ्टवेअर डाउनलोड केल्यामुळे, आपल्या कॉम्प्युटराला व्हायरसने संसर्ग होऊ शकतो. वापरकर्त्यांनी विशेषतः फ्रीवेअर डाउनलोड करण्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे अशा सॉफ्टवेअरमधून ट्रोजन इंस्टॉल केले जाऊ शकतात जो आपली गोपनीय माहिती आपल्या माहितीशिवाय हॅकर किंवा फसवणूक करणार्याला प्रसारित करेल.
वेबसाइटचे गोपनीयता धोरण वाचा:
नाव, ईमेल आयडी, संपर्क क्रमांक इत्यादींसारख्या कोणत्याही वैयक्तिक माहिती शेअर करण्यापूर्वी आपण वेबसाइटचे गोपनीयता धोरण वाचल्याची खात्री करा आणि वेबसाइट मालकाकडून आपली माहिती कशी वापरली जाईल याची जाणीव ठेवा.
एटीएम/डेबिट कार्ड सुरक्षितता टिपा
आपल्याला कार्ड मिळाल्यावर लक्षात ठेवण्यासारख्या टिपा
- आपण रोख रक्कम आणि चेक बुकची काळजी घेता तसे आपले कार्ड नेहमी सुरक्षित ठिकाणी ठेवा
- आपल्याला ते मिळाल्यावर, आपल्या एटीएम/डेबिट कार्डवर सही पॅनेलमध्ये सही करा
- आपला पिन (वैयक्तिक ओळख क्रमांक) कुठेही लिहू नका. तो लक्षात ठेवा
- आपल्याला बदली कार्ड मिळाल्यास, आपल्या जुन्या कार्ड चार तुकडे करून नष्ट करण्याची खात्री करा आणि तुकडे टाकून द्या
एटीएममध्ये व्यवहार करताना लक्षात ठेवण्यासारख्या टिपा
- आपला पिन (वैयक्तिक ओळख क्रमांक) एंटर करताना कोणी पाहणार नाही याची खात्री करा
- एटीएम वापरताना अनोळखी व्यक्तीची कधीही मदत घेऊ नका
- आपला व्यवहार पूर्ण केल्यानंतर आपले कार्ड आणि रोख ताबडतोब सुरक्षित ठेवा. एटीएम क्षेत्र सोडण्यापूर्वी नेहमी आपली रक्कम आत मध्येच मोजा.
- आपल्या व्यवहाराची नोंद एटीएममध्ये सोडू नका. टाकून देण्यापूर्वी त्याचे तुकडे करा
- आपला एटीएम पिन वरचेवर बदलत राहावा, किमान महिन्यातून एकदा तरी
खरेदीसाठी आपले डेबिट कार्ड वापरताना लक्षात ठेवण्यासारख्या टिपा
- आपल्याला माहीत असलेल्या आणि आपण विश्वास ठेवू शकता अशा व्यापार्यांकडे आपले कार्ड वापरा. दुकानदाराला आपले कार्ड स्वाइप करण्यासाठी वेगळ्या दुकानामध्ये/रूममध्ये नेण्याची परवानगी देऊ नका
- खरेदी पूर्ण केल्यानंतर आपले डेबिट कार्ड आपल्याला परत केले जाईल याची खात्री करा; आणि परत केलेले कार्ड आपले स्वतःचे आहे याची खात्री करा
- खरेदी केल्यानंतर आपली चार्ज स्लिप नेहमी आपल्यासोबत घ्या आणि कोणत्याही कार्बन कॉपी फाडून टाका
- आपल्या कार्ड व्यवहारांची पडताळणी करण्यासाठी आपल्या मासिक बिलिंग विवरणांच्या पावत्या तपासा. कोणत्याही अनधिकृत व्यवहाराची त्वरित तक्रार नोंदवा
- आपल्या कार्डावरील व्यवहारांची पडताळणी करण्यासाठी आपल्याकडील चार्ज स्लिप आणि आपल्या खात्याचे मासिक स्टेटमेंट यांची जुळवणी करून पहावी.
- एकदा आपण आपल्या खात्याच्या स्टेटमेंटमध्ये मेळ घातल्यानंतर, सर्व चार्ज स्लिप्स फाडून टाका आणि त्या टाकून द्या
पिन आणि पासवर्ड्स बाबत सुरक्षितता टिपा
पिन सुरक्षितता
- पिन लक्षात ठेवल्यानंतर पिन मेलर नष्ट करा आणि/ किंवा पहिल्या वापरानंतर पिन बदला
- आपला पिन आणि एटीएम कार्ड/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड कधीही एकत्र ठेवू नका
- पासवर्ड सुरक्षितता
- आपला पासवर्ड क्लिष्ट आणि इतरांना अंदाज लावणे कठीण असेल असा असावा. आपल्या पासवर्डमध्ये अक्षरे, संख्या आणि विशेष वर्ण [जसे की, !, @, #, $, %, ^, *, (, )] वापरा
- आपले नाव/टोपणनाव, आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे, आपला पत्ता, फोन नंबर किंवा चोराला आपल्या पर्स किंवा वॉलेटमध्ये सापडेल अशी कोणतीही माहिती यासारखे स्पष्टपणे ओळखता येतील असे पासवर्ड्स वापरू नका
- जो पासवर्ड आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये लॉग इन करण्यासाठी किंवा आपले ईमेल अॅक्सेस करण्यासाठी वापरता तोच पासवर्ड वापरू नका
- आपले लॉग-इन आयडी किंवा पासवर्ड्स सुरक्षित वेब साइटच्या साइन-इन पेजवर आपोआप दिसत असल्यास, आपण आपल्या माहितीची सुरक्षा वाढवण्यासाठी स्वयं-पूर्ण कार्य अक्षम केले पाहिजे. "Auto Complete" कार्य अक्षम करणे
- अ. इंटरनेट एक्स्प्लोरर उघडा आणि "Tools">>"Internet Options">>"Content" वर क्लिक करा
- ब. "Personal Information" अंतर्गत, "Auto Complete" वर क्लिक करा
- क. "User names and passwords on forms" वरील खूण काढून टाका आणि "Clear Passwords" वर क्लिक करा
- ड. "OK" वर क्लिक करा
- आपला इंटरनेट बँकिंग पासवर्ड (दोन्ही, लॉग-इन पासवर्ड आणि व्यवहार पासवर्ड) आपल्या पहिल्या लॉग-इननंतर आणि त्यानंतर नियमितपणे (महिन्यातून किमान एकदा) बदला
- लॉग-इन आणि व्यवहारांसाठी वेगवेगळे पासवर्ड्स तयार करा आणि योग्यरित्या हाताळा. हे इंटरनेट बँकिंगवरून आर्थिक व्यवहारांसाठी अतिरिक्त सुरक्षा पुरविते
- आपल्याकडे एकापेक्षा जास्त इंटरनेट बँकिंग वापरकर्ता आयडी असल्यास, त्या प्रत्येकासाठी वेगळा पासवर्ड वापरा. आपल्या पसंतीच्या इंटरनेट बँकिंग वापरकर्ता आयडीवरून आपली विविध खाती लिंक करून आपण कॉसमॉस बँकेमधील आपली सर्व खाती एकाच वापरकर्ता आयडी अंतर्गत पाहू शकता
- आपण सायबर-कॅफे, कोणत्याही शेअर केलेल्या कॉम्प्युटरवरून किंवा आपल्या स्वतःच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही वेबसाइटवरून (cosmosbank.com सह) अॅक्सेस करत असल्यास, असा वापर केल्यानंतर आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा घरी आपल्या स्वतःच्या कॉम्प्युटरवरून आपले पासवर्ड्स बदला. आपण अशा सायबर-कॅफे कॉम्प्युटरावर किंवा शेअर केलेल्या कॉम्प्युटरावर आपला व्यवहार पासवर्ड एंटर करता तेव्हा असे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे
- आपले पासवर्ड्स कुटुंबातील सदस्यांसह इतरांसोबत कधीही शेअर करू नका. आपला इंटरनेट बँकिंग पासवर्ड कुणासमोरही, अगदी कॉसमॉस बँकेच्या कर्मचाऱ्यासमोर उघड करू नका
चेक पुस्तिकेबाबत सुरक्षितता टिपा
- जारी केलेल्या चेक्सचे सर्व तपशील नोंदवा
- आपले चेक बुक दुर्लक्षित ठिकाणी ठेवू नका. ती नेहमी लॉक असलेल्या सुरक्षित ठिकाणी ठेवा
- आपल्याला आपले चेक बुक मिळाल्यानंतर कृपया त्यातील चेक्सची संख्या मोजा. त्यामध्ये तफावत आढळल्यास, ती तत्काळ बँकेच्या निदर्शनास आणून द्या
चेक योग्यरित्या भरण्यासाठी टिपा
- कोऱ्या चेकवर सही करू नका. चेकवर सही करण्यापूर्वी नेहमी तारीख, प्राप्तकर्त्याचे नाव आणि रक्कम भरा
- लागू असेल तेव्हा आपला चेक कर्षित (क्रॉस) करण्याचे लक्षात ठेवा आणि त्याचा गैरवापर होण्यापासून रोखा
- कोणत्याही न वापरलेल्या जागेमधून नेहमी एक रेषा ओढा
- बदल प्रमाणीकृत करत नाही तोपर्यंत इतर ठिकाणी कधीही सही करू नका
- खाडाखोड केलेले चेक वापरणे टाळा. शक्य असल्यास, नवीन चेक जारी करा
- आपण चेक रद्द करता तेव्हा, एमआयसीआर बँड नष्ट करून चेकवर “CANCEL” असे लिहा
- एमआयसीआर बँडवर लिहू नका, तसेच त्यावर चिन्ह अथवा खूण करू नका, किंवा त्या ठिकाणी पिन अथवा स्टेपल करू नका, तसेच त्यावर काही चिकटवू नका, किंवा त्या ठिकाणी घडी करू नका
सायबर कॅफे सुरक्षितता
- आपण सायबर कॅफेवरून, कोणत्याही शेअर केलेल्या कॉम्प्युटरवरून किंवा आपल्या स्वतःच्या वेबसाइट शिवाय इतर कोणत्याही वेबसाइटवरून (Cosmos.com सह) अॅक्सेस करत असल्यास, असा वापर केल्यानंतर कृपया कामाच्या ठिकाणी किंवा घरी आपल्या स्वतःच्या पीसी वरून आपले पासवर्ड्स बदला. विशेषत: आपण अशा शेअर केलेल्या कॉम्प्युटर किंवा सायबर कॅफे कॉम्प्युटरवरून आपला व्यवहार पासवर्ड एंटर असेल तेव्हा असे करणे खूप महत्त्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी किंवा घरी आपल्या स्वतःच्या पीसी वरून हे पासवर्ड्स बदला.